Lokmat Money > बिझनेस न्यूज > मायक्रॉन नंतर आता P&G गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करणार, बनणार एक्सपोर्ट हब; नोकऱ्यांचीही निर्मिती

मायक्रॉन नंतर आता P&G गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करणार, बनणार एक्सपोर्ट हब; नोकऱ्यांचीही निर्मिती

कंपनी गुजरातमध्ये पर्सनल हेल्थ केअर मॅन्युफॅक्चरिंग सुविधा उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 03:10 PM2023-06-29T15:10:25+5:302023-06-29T15:11:08+5:30

कंपनी गुजरातमध्ये पर्सनल हेल्थ केअर मॅन्युफॅक्चरिंग सुविधा उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करणार आहे.

After Micron now P&G will invest heavily in Gujarat to become an export hub Creation of jobs too 2000 crores investment | मायक्रॉन नंतर आता P&G गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करणार, बनणार एक्सपोर्ट हब; नोकऱ्यांचीही निर्मिती

मायक्रॉन नंतर आता P&G गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करणार, बनणार एक्सपोर्ट हब; नोकऱ्यांचीही निर्मिती

प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया गुजरातमध्ये नवीन पर्सनल हेल्थ केअर मॅन्युफॅक्चरिंग सुविधा उभारण्यासाठी २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतातील त्यांचा हा नववा प्लांट असेल. या ठिकाणी एरियल, जिलेट, हेड अँड शोल्डर्स, ओरल बी, पॅम्पर्स, पॅन्टिन, टाईड, विक्स आणि व्हिस्पर सारखे लोकप्रिय ब्रँड तयार केले जातील. साणंदमधील ५० हजार चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेला हा नवीन प्लांट P&G च्या ग्लोबल हेल्थकेअर पोर्टफोलिओचा भाग असलेली उत्पादने तयार करणार असल्याचं कंपनीनं एका निवेदनात म्हटलंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची सुविधा पुढील काही वर्षांत सुरू होईल आणि गुजरात जागतिक स्तरावर पी अँड जीसाठी निर्यात केंद्र बनणार आहे. यामुळे पी अँड जी इंडियाला जगभरातील ग्राहकांना सेवा देण्यात मदत होईल. याशिवाय शेकडो रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असल्यानं स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

पी अँड जी इंडियाचे सीईओ एलव्ही वैद्यनाथन यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या भेटीदरम्यान नवीन गुंतवणुकीची घोषणा केली. या सुविधेमुळे भारतातील P&G च्या विद्यमान उत्पादनात भर पडेल. गेल्या वर्षभरातील भारतीय एफएमजीसी क्षेत्रातील मल्टीनॅशनल कंपनीची ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
नवीन युनिट डायजेस्टीव्ह वेलनेक सेक्टरमधील उत्कृष्ट उत्पादनं तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल आणि व्यवसाय ४.० च्या आधुनिक संकल्पनेवर आधारित पूर्णपणे स्वयंचलित करण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी रोबोटिक डिव्हाईसेस आणि ऑपरेटर कॉकपिटचाही समावेश आहे.

 

Web Title: After Micron now P&G will invest heavily in Gujarat to become an export hub Creation of jobs too 2000 crores investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.