रिलायन्स जिओनं (Reliance Jio) काही दिवसांपूर्वी आतापर्यंतचा त्यांचा सर्वात खास प्लॅन लाँच केला होता. विशेष म्हणजे त्यात वैधता २८ दिवसांची नाही, तर सर्वाधिक ३१ दिवसांची देण्यात आली आहे. त्यानंतर आता रिलायन्स जिओच्या पावलावर पाऊल ठेवत व्होडाफोनआयडियानं (Vodafone-Idea) आपल्या पोर्टफोलिओमध्ये ३१ दिवसांच्या वैधतेचा प्लॅन सादर केला आहे.
कंपनीनं या प्लॅनची किंमत ३३७ रुपये ठेवली आहे. साध्या शब्दात सांगायचं झालं तर हा प्लॅन तुम्ही ५ एप्रिल रोजी रिचार्ज केला तर त्याची वैधता ४ मे पर्यंत असणार आहे. अशाप्रकारे ग्राहकांना पुन्हा ५ मे रोजी रिचार्ज करावं लागेल. 28 दिवसांच्या वैधतेनुसार, ग्राहकांना वर्षाला १२ महिन्यांऐवजी १३ महिन्यांसाठी रिचार्ज करावे लागतात. पण, आता हे रिचार्ज आल्यानंतर जिओप्रमाणेच व्होडाफोनआयडिया ग्राहकांना वर्षभरात फक्त १२ रिचार्ज करावे लागतील. Vodafone Idea चा हा पहिला रिचार्ज प्लॅन आहे, जो एका पूर्ण महिन्याच्या वैधतेसह येत आहे.
एकूण २८ जीबी डेटाकंपनीने हा रिचार्ज प्लॅन आपल्या वेबसाइटवर अनलिमिटेड प्लॅन्सच्या लिस्टमध्ये अॅड केला आहे. प्लॅनमध्ये यूजर्सना ३१ दिवसांच्या वैधतेसह २८ जीबी डेटा दिला जातो. त्याच वेळी, या डेटाशिवाय ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित विनामूल्य कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभ मिळेल. प्लॅनमध्ये मिळणारा डेटा, कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे ३१ दिवसांसाठी वैध असतील. या रिचार्जसह ग्राहकांना Vi Movies आणि TV Classic चं अॅक्सेस मिळेल. काही काळापूर्वी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने दूरसंचार कंपन्यांची कानउघडणी करत ३१ दिवसांची वैधता असलेला किमान एक रिचार्ज प्लॅन ऑफर करण्याचे आदेश दिले होते.