Join us

NDTV नंतर ACC, Ambuja सीमेंटमधील हिस्सा खरेदीसाठी अदानींची ३१ हजार कोटींची ओपन ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 4:01 PM

अंबुजा सीमेंट्स आणि एसीसीचं स्वामित्व स्वित्झर्लंडच्या होल्सीम ग्रुपच्या मालकीचे होते. अदानी समुहाने मे महिन्यात 10.5 अब्ज डॉलर्समध्ये अदानी समुहाने भारतीय व्यवसायाचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती.

एनडीटीव्ही मीडिया समूहाच्या भागीदारीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अदानी समूहाने सीमेंट क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्यांमध्ये हिस्सा खरेदी करण्यासाठी शेअर धारकांना ओपन ऑफर दिली आहे. अदानी समूह अंबुजा सिमेंट्स आणि ACC मधील 26-26 टक्के हिस्सा विकत घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी अदानी समूहाने 31,000 कोटी रुपयांची ओपन ऑफर आणली आहे.

अंबुजा सीमेंट्स आणि एसीसीचा मालकी हक्कल स्वित्झर्लंडमधील होल्सिम समुहाकडे होता. अदानी समुहानं होल्सिमच्या भारतीय व्यवसायाची 10.5 अब्ज डॉलर्समध्ये अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. बाजार नियामनक सेबीनंही या ओपन ऑफरसाठी गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती. जर ऑफर पूर्णपणे सबस्क्राइब झाली तर ती 31,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते.

आजपासून ओपन ऑफर

अंबुजा सिमेंट्स आणि ACC यांनी अदानी समूहाची उपकंपनी असलेल्या मॉरिशस स्थित एंडेव्हर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट्सद्वारे ठेवल्या जाणार्‍या खुल्या ऑफरसाठी स्वतंत्र नियामक फाइलिंग्जमध्ये त्यांची पत्रं दिली होती. ओपन ऑफर २६ ऑगस्टपासून सुरू झाली असून ९ सप्टेंबरला संपेल. समुहाने एंडेव्हर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून मे महिन्यात अंबुजा सिमेंटसाठी 385 रुपये प्रति शेअर आणि ACC लिमिटेडसाठी रुपये 2,300 प्रति शेअरची ओपन ऑफर दिली होती.

टॅग्स :अदानीव्यवसाय