BSNL News : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे, जी आपल्या नवीन सेवेनं लोकांना आकर्षित करत आहे. काही दिवसांपूर्वी बीएसएनएलनं आपले डीटूडी तंत्रज्ञान सादर केले होते, ज्याअंतर्गत लोक आता नेटवर्क शिवायही कॉल करता येणार आहे. आता बीएसएनएल एका नव्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीवर काम करत आहे, ज्याअंतर्गत लोकांना सेट टॉप बॉक्सशिवाय टीव्ही चॅनेलचा (Set top box) आनंद घेता येणार आहे. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.
मिळणार IPTV सेवा
बीएसएनएलच्या नव्या सेवेत लोकांना अॅडव्हान्स्ड टेलिव्हिजन आणि इंटरनेटचा अनुभव मिळणार आहे. यासाठी बीएसएनएलनं आयपीटीव्ही सेवा पुरवठादार स्कायप्रोसोबत हातमिळवणी केलीये. स्कायप्रो कंपनी सेट टॉप बॉक्सशिवाय स्मार्ट टीव्हीवर टीव्ही कंटेंट पुरवते. स्कायप्रोसोबत बीएसएनएलची भागीदारी लोकांना डिजिटल एन्टरटन्मेंटचा आनंद घेण्यासाठी मदत करेल. यामध्ये लोकांना हायस्पीड ब्रॉडबँड सेवाही दिली जाणार आहे.
आयपीटीव्ही सेवा म्हणजे काय?
बीएसएनएलच्या आयपीटीव्ही सेवेमध्ये लोकांना सेट टॉप बॉक्सशिवाय ५०० एचडी/एसडी/लाइव्ह चॅनेल मिळतील. यासोबतच २० हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेसही मिळणार आहे. बीएसएनएल ब्रॉडबँड नेटवर्कवरही काम करत आहे.