जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत अब्जाधीश आणि टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या कंपनीननं बीअर लाँच केली आहे. टेस्ला युरोपच्या अधिकृत ट्विटर हँडलनं टेस्ला गिगाबियर जगासमोर आणली आहे. याची किंमत £79 (8000 रुपयांपेक्षा जास्त) आहे. टेस्लाच्या सायबरट्रकपासून प्रेरित असलेल्या या बीअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण पाच टक्के आहे. ही बीअर तीन बाटल्यांच्या पॅकमध्ये येते. प्रत्येक बाटलीमध्ये 330 मिली बिअर असते. सुमारे दीड वर्षापूर्वी जर्मनीतील एका कार्यक्रमादरम्यान मस्क यांनी बिअर लाँच करण्याची घोषणा केली होती.
जर्मनीमध्ये बनवलेली Tesla GigaBear बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, आयर्लंड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड, नॉर्वे, ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डममध्ये खरेदी करता येणार आहे.
Brewed for cyborgs, made by humans—Giga Bier now available → https://t.co/5IBX8ymKa4pic.twitter.com/R3vYgqKrx7
— Tesla Europe (@tesla_europe) March 30, 2023
टेस्लाचे पहिले अल्कोहोलिक ड्रिंक टेस्ला टकीला होते, ज्याची किंमत 2 डॉलर्स होती. ग्राहकांना फक्त दोन बॉटल्स मागवण्याची परवानगी होती. आता त्याची eBay वर 150 डॉलर्स आणि 200 डॉलर्स दरम्यान विक्री केली जाते.
परफ्युमचीही होते विक्री
गेल्या वर्षी इलॉन मस्कनं ब्रन्ट हेअर परफ्यूम ब्रँड लाँच केला. त्यांच्या परफ्यूमची किंमत 100 डॉलर्स निश्चित करण्यात आली आहे. मस्क हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत अब्जाधीश आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटरही खरेदी केलं होतं.