Join us

पेट्रोलनंतर आता सीएनजीही महागला! देशातील आठ मोठ्या शहरांत पेट्रोलने केली शंभरी पार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 9:28 AM

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांबरोबरच आता दिल्ली आणि परिसरामध्ये सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पेट्राल, डिझेलच्या दरात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ करण्यात आली. पेट्रोल ३५ पैशांनी, तर डिझेल ९ पैशांनी महागले. दरम्यान देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये  पेट्रोल शंभरी पार गेले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, नव्या दरवाढीनंतर डिझेलचे दर दिल्लीत ८९.६२ रुपये लीटर झाले. मुंबईत ९७.१८ रुपये, कोलकात्यात  ९२.६५ रुपये आणि चेन्नईत ९४.१५ रुपये लीटर असे डिझेलचे दर झाले.देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर शतक पार करून गेले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल १००.५६ रुपये, मुंबईत  १०६.५९ रुपये, कोलकात्यात १००.६२ रुपये, चेन्नई १०१.३७ रुपये दर आहेत. याशिवाय बंगळुरूमध्ये १०३.९३ रुपये, थिरुवनंतपुरम १०२.५४ रुपये, जयपूर १०७.३७ रुपये आणि भोपाळमध्ये १०८.८८ रुपये प्रतिलीटर असा पेट्रोलचा दर झाला आहे. मेपासून दरवाढ झाली आहे.

दिल्लीमध्ये सीएनजीही महागलापेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांबरोबरच आता दिल्ली आणि परिसरामध्ये सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ कंपनीने  किलोमागे सीएनजीच्या दरामध्ये ९० पैशांनी वाढ केली आहे. याशिवाय पाईपद्वारे पुरविण्यात येणाऱ्या स्वसंपाकाच्या गॅसच्या दरामध्येही  एक घनमीटरला १.२५ रुपयांची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढीमुळे ही दरवाढ आहे. 

टॅग्स :पेट्रोलडिझेलमुंबईदिल्ली