आयपीएलचा नवा हंगाम (IPL 2022) सुरू झाला आहे आणि अशा परिस्थितीत टेलिकॉम कंपन्या आपल्या युझर्ससाठी डिस्ने + हॉटस्टारचे (Disney+ Hotstar) प्लॅन्स घेऊन आल्या आहेत. Reliance Jio नंतर, आता Vodafone-idea ने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये Disney+ Hotstar सबस्क्रीप्शन मोफत उपलब्ध असेल. याआधी कंपनीकडे असे आणखी तीन प्लॅन्स होते.
Vodafone Idea चे Disney+ Hotstar प्रीपेड प्लान
Vodafone-Idea चा पहिला प्लॅन 499 रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा दिला जाईल. प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी देण्यात येत आहे. तसंच दररोज अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएसही दररोज दिले जात आहेत.
कंपनी ऑफर करत असलेल्या दुसऱ्या प्लॅनची किंमत 1066 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा दिला जातो. परंतु या प्लानची वैधता 84 दिवसांची आहे. 499 रुपयांच्या प्लॅन प्रमाणे यामध्ये Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी दिले जाते. यासोबतच अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS ही दररोज दिले जात आहेत. हे दोन्ही प्लॅन्स Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delight सारख्या फीचर्ससह येतात.
यापूर्वीचे प्लॅन्स
कंपनीकडे 601 रुपये, 901 रुपये आणि 3099 रुपयांचे असे 3 प्लॅन आहेत, जे Disney + Hotstar च्या सबस्क्रीप्शनसह येतात . या प्लॅनमध्ये अनुक्रमे 28 दिवस, 70 दिवस आणि 365 दिवसांची वैधता देण्यात आली येते. 601 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटासह 16GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. त्याच वेळी, 901 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 GB डेटासह 48GB अतिरिक्त डेटा देण्यात येतो. तर 3099 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज फक्त 1.5 GB डेटा मिळतो.