मुंबई : रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाजारात नफा वसुली बोकाळली. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९७.४१ अंकांनी घसरला. निफ्टीही ८,७00 अंकांच्या खाली आला आहे.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्समधील आजची घसरण 0.३५ टक्का इतकी होती. तो २८,0८५.१६ अंकांवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने ४८५ अंक कमावले होते. व्यापक आधारावरील निफ्टी ३३.१0 अंकांनी अथवा 0.३८ टक्क्याने घसरून ८,६७८.२५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २१ कंपन्यांचे समभाग घसरले. ९ कंपन्यांचे समभाग वाढले. वाढ नोंदविणाऱ्या कंपन्यांत कोल इंडिया, ओएनजीसी, एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, अॅक्सिस बँक, इन्फोसिस आणि डॉ. रेड्डीज यांचा सहभाग आहे.
घसरण झालेल्या कंपन्यांत लुपीन, एचडीएफससी, पॉवर ग्रीड, हीरो मोटोकॉर्प, एम अँड एम, टाटा स्टील, भारती एअरटेल, बजाज आॅटो, एल अँड टी, गेल, सन फार्मा, मारुती सुझुकी, सिप्ला, एशियन पेंटस् यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
पतधोरणानंतर मुंबई शेअर बाजार घसरला
रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाजारात नफा वसुली बोकाळली. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९७.४१ अंकांनी घसरला.
By admin | Published: August 10, 2016 04:00 AM2016-08-10T04:00:33+5:302016-08-10T04:00:33+5:30