Lokmat Money > बिझनेस न्यूज > सॅम ऑल्टमननंतर आता इलॉन मस्क यांची वेळ! टेस्लामधून काढून टाकण्याची मागणी का होतेय?

सॅम ऑल्टमननंतर आता इलॉन मस्क यांची वेळ! टेस्लामधून काढून टाकण्याची मागणी का होतेय?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 10:44 PM2023-11-21T22:44:05+5:302023-11-21T22:45:00+5:30

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

After Sam Altman, it's time for Elon Musk! Why are demands to be removed from Tesla? | सॅम ऑल्टमननंतर आता इलॉन मस्क यांची वेळ! टेस्लामधून काढून टाकण्याची मागणी का होतेय?

सॅम ऑल्टमननंतर आता इलॉन मस्क यांची वेळ! टेस्लामधून काढून टाकण्याची मागणी का होतेय?

एका वर्षापूर्वी ChatGPT ची निर्मिती करणाऱ्या OpenAI कंपनीने सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना अचानक पदावरुन दूर केले आहे. मायक्रोसॉफ्टशी संलग्न ओपन एआय कंपनीने घेतलेला हा निर्णय अतिशय धक्कादायक असल्याचे अनेकांचे म्हणने आहे. आता टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या निलंबनाची चर्चा सुरू आहे. टेस्लाच्या एका भागधारकाने कंपनीच्या बोर्डाकडे ही मागणी केली आहे. या शेअरहोल्डरचे म्हणणे आहे की, मस्क यांनी सोशल मीडियावर सेमिटिक विरोधी विचारांचे समर्थन केले आहे. गेल्या आठवड्यात ज्यू लोक गोर्‍या लोकांविरुद्ध द्वेष पसरवतात असे ट्विटरवर सेमिटिक विरोधी पोस्ट करण्यात आली होती. मस्क यांच्यावर या पोस्टचे समर्थन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत.

...तर जबर दंडात्मक कारवाई करू, सुप्रीम कोर्टाने पतंजलीला दिला इशारा

टेस्लाचे गुंतवणूक आणि सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ञ जेरी ब्रॉकमन यांनी मस्क यांना टेस्लामधून निलंबित करण्याची मागणी केली आहे. ब्रॅकमन हे फर्स्ट अमेरिकन ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी म्हटले की, मस्क यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून टेस्लाच्या बोर्डाने त्यांना धडा शिकवावा.  त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे, परंतु सार्वजनिक कंपनीच्या सीईओने अशा प्रकारचा द्वेष पसरवला तर माफ होणार नाही.' Disney, NBCuniversal, Warner Bros. आणि इतर अनेक ब्रँड्सनी एक्सवर त्यांच्या जाहिरातींना विराम दिला आहे. ट्विटर मस्क यांनी विकत घेतले आणि त्याचे नाव बदलून एक्स केले.

ब्रॅकमन म्हणाले की, टेस्लाच्या बोर्डाने मस्क यांनी ३० ते ६० दिवसांच्या रजेवर पाठवले पाहिजे आणि त्यांना सहानुभूती प्रशिक्षण किंवा थेरपी घेणे आवश्यक आहे. 'मस्क ज्या प्रकारची विधाने करत आहेत त्यात काही अर्थ नाही. यावरून त्यांच्या आतल्या सैतानाची झलक दिसून येते. हे स्पष्ट आहे की त्यांना मदतीची आवश्यकता आहे. येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील नेतृत्व अभ्यासाचे डीन जेफ्री सोनेनफेल्ड यांनीही ब्रॉकमनशी सहमती दर्शवली, टेस्लाच्या बोर्डाने मस्क यांच्यावर कारवाई करावी. त्यांना सीईओ पदाच्या जबाबदारीतून तत्काळ मुक्त करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

इलॉन मस्क संचालक मंडळावर देखील आहेत आणि कंपनीचे सर्वात मोठे भागधारक आहेत. मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे कंपनीचे ४१.१ कोटी शेअर्स आहेत. अशा प्रकारे, मस्कची कंपनीमध्ये १३% भागीदारी आहे, याची किंमत सुमारे ९६ अब्ज डॉलर आहे. दुसरीकडे, फर्स्ट अमेरिकनकडे कंपनीचे फक्त १६,००० शेअर्स आहेत. रॉबिन डेनहॅम हे टेस्लाच्या बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त, कंपनीच्या बोर्डात जेम्स मर्डोक, उद्यम भांडवलदार इरा एहरनप्रेइस, मस्कचा भाऊ किंबल मस्क आणि स्वतः मस्क यांचा समावेश आहे. ब्रॅकमन म्हणाले की टेस्लाच्या बोर्डावर मस्कचे बरेच मित्र आहेत.

Web Title: After Sam Altman, it's time for Elon Musk! Why are demands to be removed from Tesla?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.