मुंबई - सततच्या वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये एक दिलासादायक वृत्त समोर आलं आहे. गेल्या सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतच आहेत. गेल्या सात महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत नऊ रुपयांनी वाढ झाली होती. पण आता मिळालेल्या वृत्तानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं पुढील काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.
आजपासून पुढील काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होणार आहेत. त्यामुळं सर्वसामन्यांसाठी हे दिलासादायक वृत्त आहे. आज पेट्रोल 21 पैशांनी स्वत झालं आहे. तर डिझेल प्रति लिटर 28 पैशांनी स्वस्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्यामुळं काही दिवसांमध्ये सर्वसामन्यांना दिलासादायक आणि अच्छे दिन येणार आहेत.
सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 73.01 रुपये तर कोलकातामध्ये 75.70 रुपये आहे. मुंबईमध्ये 80.87 रुपये, चेन्नईमध्ये 75.73 रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळते. डिझेल दिल्लीमध्ये 63.62, कोलकातामध्ये 66.29, मुंबईमध्ये 67.75 आणि चेन्नईमध्ये 67.09 रुपये प्रति लीटर दरात मिळेल.
पेट्रोल (Rs. per litre) | ||||
12-फेब्रुवारी | 11-फेब्रुवारी | 31-डिसेंबर | 1-जानेवारी-17 | |
नवी दिल्ली | 73.01 | 73.22 | 69.97 | 66.91 |
कोलकाता | 75.7 | 75.91 | 72.72 | 69.52 |
मुंबई | 80.87 | 81.08 | 77.87 | 78.44 |
चेन्नई | 75.73 | 75.95 | 72.53 | 69.93 |
डिझेल (Rs. per litre) | ||||
नवी दिल्ली | 63.62 | 63.9 | 59.64 | 55.94 |
कोलकाता | 66.29 | 66.57 | 62.3 | 58.28 |
मुंबई | 67.75 | 68.05 | 63.27 | 61.67 |
चेन्नई | 67.09 | 67.39 | 62.83 | 59.22 |
(सोर्स: iocl.com) |
दरम्यान, एक फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अरुण जेटली यांनी अबकारी करामध्ये कपात केली होती. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता होती.
अर्थसंकल्पातील तरतूदी -
- अनब्रॅण्डेड पेट्रोलवर प्रतिलीटर ६.४८ रुपये अबकारी कर आकारला जात होता, तो आता ४.४८ रुपये केला आहे.
- ब्रॅण्डेड पेट्रोलवर प्रतिलीटर ७.६६ रुपये अबकारी कर आकारला जातो, तो आता ५.६६ रुपये झाला आहे.
- अनब्रॅण्डेड डिझेलवर प्रतिलीटर ८.३३ रुपये अबकारी कर आकारला जातो, तो आता ६.३३ रुपये झाला आहे.
- ब्रॅण्डेड डिझेलवर प्रतिलीटर १०.६९ रुपये अबकारी कर आकाराला जात होता, तो आता ८.६९ रुपये झाला आहे.