IRCTC Share Price: शुक्रवारी कामकाजाच्या दरम्यान IRCTC चे शेअर्स (IRCTC Shares) जबरदस्त आपटले होते. कामकाजाच्या सुरूवातीच्या टप्प्यात आयआरसीटीसीच्या शेअर्सला लोअर सर्किटही लागलं होतं. सरकारनं कंपनीला आपल्या बेवसाईटवरून येणाऱ्या सेवा शुल्काच्या रूपात येणाऱ्या महसूलातील ५० टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आयआरसीटीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घरसण दिसून आली होती. परंतु शुक्रवारी रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर शेअर्समध्ये पुन्हा वाढ झाली.
दीपम (DIPAM) च्या सचिवांनी यासंदर्भात एक ट्वीट करत माहिती दिली. "रेल्वे मंत्रालयानं आयआरसीटीसीच्या सेवा शुल्कावरील निर्णय मागे घेण्याची घोषणा केली आहे," असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं. गुरूवारी Stock Split नंतर १० टक्क्यांपेक्षा अधिक वर गेलेला आयआरसीटीसीचा शेअर शुक्रवारी सकाळी कामकाजादरम्यान २५ टक्क्यांपर्यंत खाली आला. आयआरसीटीच्या शेअरला ६८५.१५ रूपयांचं लोअर सर्किटही लागलं होतं.