Join us  

रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:12 PM

Ratan Tata News : पाहूया आज टाटा समूहाच्या शेअर्सची स्थिती काय आहे.

Ratan Tata News:  रतन टाटा या नावाला कुठल्याही ओळखीची गरज नाही. भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वावर नजर टाकली तर ते केवळ उद्योजकच नाही, तर ते उदार व्यक्ती, लोकांसाठी आदर्श आणि प्रेरणास्थान होते. एकापाठोपाठ एक नवनवीन कंपन्या सुरू करून त्यांनी त्या कंपन्यांना एका उंचीवर पोहोचवलं. टीसीएसपासून टाटा मोटर्स आणि ट्रेंटसारख्या कंपन्या शेअर बाजारात आज नाव कमावून आहेत. जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं (टीसीएस) नाव आवर्जून घेतलं जातं. टाटा समूहाचे सर्वाधिक मार्केट कॅप असलेली ही कंपनी आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या येत होत्या. अशात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये शेअर्समध्ये संभाव्य घसरण होण्याची चर्चा होती. रतन टाटांना काही झालं तर शेअर्स घसरतील, असं त्यांना वाटत होतं. पण आता उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांची स्थिती काय आहे हे जाणून घेऊ?

सध्या टाटांच्या शेअर्सची स्थिती काय आहे हे तुम्हाला वरच्या चार्टवरून समजलंच असेल. खरं तर टाटा समूह कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून नाही. संपूर्ण समूहाचं काम टाटा सन्स नावाच्या ट्रस्टद्वारे पाहिलं जातं आणि प्रत्येक कंपनीचे स्वतःचे नियम आणि अधिकारी असतात. सध्या टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन आहेत.

टॅग्स :रतन टाटाटाटाशेअर बाजार