Lokmat Money > बिझनेस न्यूज > मर्जरनंतर HDFC बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता मिळणार खास फायदा!

मर्जरनंतर HDFC बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता मिळणार खास फायदा!

या शहरांमध्ये मिळेल ई-रुपी सुविधा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 08:21 PM2023-07-13T20:21:53+5:302023-07-13T20:22:16+5:30

या शहरांमध्ये मिळेल ई-रुपी सुविधा...

After the merger, HDFC Bank gave happy news to millions of customers hdfc bank onboards one lakh customers and 1. 7 lakh merchants with digital rupee | मर्जरनंतर HDFC बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता मिळणार खास फायदा!

मर्जरनंतर HDFC बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता मिळणार खास फायदा!

एचडीएफसीबँकेत खाते असणाऱ्यां ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने, प्रायोगिक तत्त्वावर जारी सेंट्रल बँक डिजिटल रुपीसोबत (CBDC) एक लाखाहून अधिक ग्राहक आणि 1.7 लाखांहून अधिक व्यापारी जोडल्याचा दावा केला आहे.

सेंट्रल बँक प्रोग्रॅमची सुरुवात -
बँकेने परस्पर व्यवहार सुलभ व्हावा यासाठी ई-रुपी प्लॅटफॉर्मसह UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) 'QR कोड'देखील सुरू केला आहे. CBDC हे केंद्रीय बँकेकडून जारी चलनाचे डिजिटल रूप आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घाऊक विभागात सेंट्रल बँक डिजिटल चलन कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर (central bank digital currency program) सुरू केला होता. तसेच, डिसेंबर महिन्यात किरकोळ व्यवहारासाठी तो सुरू करण्यात आला होता.

RBI चे डेप्यूटी गव्हर्नर यांनी दिली माहिती -
आरबीआयचे डेप्यूटी गव्हर्नर टी रवी शंकर आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणाले होते की, मॉनिटरी अथॉरिटी वर्षाच्या अखेरीस डिजिटल रूपयातील व्यवहाराची सीमा प्रतिदिन 5,000-10,000 रुपयांवरून 10 लाख रुपये प्रतिदिन करण्याचा विचार करत आहे.

बँकांची संख्या वाढली- 
पायलट प्रोजेक्टमध्ये बँकांची संख्या सुरुवातीला आठ होती, ती आता वाढून 13 झाली आहे. सध्या CBDC चे 1.3 दशलक्ष वापरकर्ते आहेत, यांपैकी तीन दशलक्ष व्यापारी आहेत. शंकर म्हणाले, यावर्षी एप्रिल अखेरपर्यंत केवळ एक लाख वापरकर्ते होते, जे आता 13 लाख झाले आहेत.

UPI च्या माध्यमाने चालेल व्यवहार -
केंद्रीय बँकेने सीबीडीसी सादर केल्यानंतर, जूनमध्ये यूपीआयच्या माध्यमाने डिजिटल रुपयांच्या आपसातील व्यवहारांची घोषणा केली आहे. HDFC बँकेने गुरुवारी ‘यूपीआय क्यूआर कोड’ सुरू करण्या बरोबरच, आपण एकीकरण प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या पहिल्यां बँकापैकी एक असल्याचे म्हटले आहे.

या शहरांमध्ये मिळेल ई-रुपी सुविधा -
एचडीएफसी बँक सध्या 26 शहरांमध्ये ई-रुपी पेमेंट सुविधा देत आहे. सर्व प्रमुख महानगरांव्यतिरिक्त यात, भुवनेश्वर, गुवाहाटी, गंगटोक, इंदूर, भोपाळ, लखनौ, पाटणा, कोची, गोवा, शिमला, जयपूर, रांची, नागपूर, वाराणसी, विशाखापट्टणम, पुद्दुचेरी आणि विजयवाडा या शहरांचा समावेश आहे.
 

Web Title: After the merger, HDFC Bank gave happy news to millions of customers hdfc bank onboards one lakh customers and 1. 7 lakh merchants with digital rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.