Lokmat Money > बिझनेस न्यूज > राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई!

राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई!

देश-विदेशातील लोक रामललांच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. पर्यटनासोबतच अयोध्येत ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक्स उद्योगाने चांगलीच उसळी घेतली आहे. याशिवाय अयोध्येत आणखी एका उद्योगाची चर्चा होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 09:53 AM2024-01-24T09:53:28+5:302024-01-24T09:55:30+5:30

देश-विदेशातील लोक रामललांच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. पर्यटनासोबतच अयोध्येत ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक्स उद्योगाने चांगलीच उसळी घेतली आहे. याशिवाय अयोध्येत आणखी एका उद्योगाची चर्चा होत आहे.

After the Ram Mandir, now people will be rich from this business, bumper earnings will be made every day | राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई!

राम मंदिरानंतर आता या बिझनेसमधून मालामाल होणार लोक, रोजच्या रोज होईल बंपर कमाई!

अयोध्येत 22 जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठा समारंभ पार पडला. भव्य राम मंदिरात रामलला विराजमान झाले. देश-विदेशातील लोक रामललांच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचत आहेत. पर्यटनासोबतच अयोध्येत ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक्स उद्योगाने चांगलीच उसळी घेतली आहे. याशिवाय अयोध्येत आणखी एका उद्योगाची चर्चा होत आहे. या बिझनेस आहे होमस्टेचा (Homestay business in ayodhya). या बिझनेसमुळे अयोध्येतील हजारो कुटुंबांना रोजगार मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, अयोध्येतील नागरिकांनी राम भक्तांचा अयोध्येकडील ओढा पाहता होमस्टे बिझनेस सुरू देखील केला आहे. 

अयोध्येतील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेत येथील लोकांनी मोठ्या प्रमाणावर होमस्टे सुरू करण्यासाठी अर्जही केले आहेत. राम मंदिरानंतर, आता अयोध्येतील हॉटेलमध्ये राहण्याचे भाडेही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे येथे आगामी काळात हॉटेल उद्योगात मोटी वाढ होण्याचे चित्र आहे. एढेच नाही, तर येथे हॉटेल बरोबरच, गेस्ट हाऊस शिवाय धर्मशाळा आणि होमस्टेची मागणीही वाढली आहे.

घरांना होमस्टे बनवतायत लोक -
अयोध्येत पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे लक्षात घेत आता लोकांनी आपल्या घरांना होम स्टे करायला सुरुवात केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, अयोध्येत जवळपास  800 हून अधिक लोकांनी होमस्टे प्रमाणपत्रासाटी अर्ज केला आहे. यांपैकी आतापर्यंत 500 जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेश सरकारही लोकांना होम स्टे सुरू करण्यास प्रोत्साहित करत आहे. 

बनेल उत्पन्नाचे साधन -
अयोध्येत कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री अथवा कारखाने नाहीत. यामुळे लोकांचे उत्पन्न वाढावे म्हणून सरकार त्यांना होमस्टेसाठी प्रोत्साहित करत आहे. विसेष म्हणजे, सरकार ने होमस्टेला "गैर-व्यावसायिक उपक्रमात" टाकले आहे. यामुळे होमस्टेला कोणताही व्यावसायिक कर भरण्यापासून सूट मिळते. यामुले येथे मोठ्या प्रमाणावर लोक होमस्टे सुरू करण्याकडे वळत आहेत.

किती होईल कमाई - 
लोक 2 ते 5 रूमसह आपल्या घरातच होमस्टे सुरू करू शकतात. ते होम स्टेमध्ये एका रूमसाठी प्रति दिवस जवळपास 1500 ते 3000 रुपये भाजे घेऊ शकतात. होमस्टेमुळे स्थानिक खाद्यपदार्थांनाही प्रोत्साहन मिळेल. यामुळेही लोकांना चांगली कमाई करता येईल.

Web Title: After the Ram Mandir, now people will be rich from this business, bumper earnings will be made every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.