नवी दिल्ली : दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने गुरुवारी १९० रुपयांनी वधारून २६,२५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. चांदीही ६२५ रुपयांनी वधारून ३४,०२५ रुपये प्रति किलो झाली.आज जागतिक बाजारात सोन्याला अनुकूल वातावरण होते. त्याचा परिणाम स्थानिक सराफांवर झाला. सराफांनी खरेदी केल्याने सोने महागल्याने व्यापारी सूत्रांनी सांगितले.आज जागतिक बाजारात काही देशांत शेअर बाजारात घसरण झाली, तर काही वस्तूंचे दरही घसरले. त्यातच अमेरिकेची फेडरल बँक पुन्हा एकदा व्याजदर वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित मार्ग म्हणून सोन्याकडे मोर्चा वळविला, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.डॉलरच्या तुलनेत रुपया महागल्याने सोन्याची आयातही महागणार आहे. याचा परिणामही सोन्यावर झाला. सोन्याप्रमाणेच चांदीवरही परिणाम झाला. कारखानदार आणि नाणे उत्पादक यांच्याकडून मागणी वाढल्याने चांदी ६२५ रुपयांनी महागून ३४,०२५ रुपये प्रति किलो झाली. चांदी महागली असली तरीही चांदीच्या नाण्याच्या दरात मात्र काहीही फरक झाला नाही. १०० नाण्यांच्या खरेदीचा दर ४८ हजार रुपये, तर विक्रीचा दर ४९ हजार रुपये हाच स्थिर राहिला.
दोन दिवसांच्या मंदीनंतर सोन्या-चांदीचा भाव वधारला
By admin | Published: January 15, 2016 2:44 AM