नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे गुरुवारी (7 मे) विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गॅस गळतीमुळे शहरात 11 जणांच्या मृत्यू झाला 300 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच 5 हजारांपेक्षा जास्त लोक या गॅसगळतीने आजारी पडले आहेत. या घटनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने रविवारी (10 मे) लॉकडाऊनची दरम्यान आणि त्यानंतर उत्पादन कंपन्यांमधील उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. लॉकडाऊनदरम्यान यांत्रिक, विद्युत आणि रासायनिक उपकरणे बंद होती. मात्र हे मजुरांसाठी घातक ठरत असल्याचे लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) सदस्य सचिव जीव्हीव्ही सरमा यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. लॉकडाऊन कालावधीत अनेक आठवडे लॉकडाऊन व औद्योगिक युनिट बंद पडल्यामुळे काही ऑपरेटर प्रस्थापित प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) पाळत नसल्याची शक्यता आहे. परिणामी, काही उत्पादन सुविधा, पाईपलाईन, वाल्व्हमध्ये रसायने असू शकतात ज्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. घातक रसायने आणि ज्वलनशील पदार्थांसह स्टोरेज सुविधांमध्ये अशाच पद्धतीची समस्या असून त्यामुळेही धोका निर्माण होतो.
ज्यावेळी लॉकआऊट / टॅगआऊट प्रक्रिया राबविली जात नाही, त्यावेळी विद्युत, यांत्रिक किंवा रासायनिक उपकरणांची सेवा किंवा देखभाल करणार्या ऑपरेटर / पर्यवेक्षकासाठी बरेच ऊर्जा स्त्रोत घातक ठरू शकतात. तसेच, अवजड यंत्रे आणि उपकरणांची वेळेत देखभाल न केल्यास, ती धोकादायक ठरू शकतात, असे जीव्हीव्ही सरमा यांनी सांगितले. याशिवाय, लॉकडाऊन दरम्यान आणि त्यानंतर उद्योग पुन्हा सुरु झाल्यानंतर सुरक्षतेची विशेष काळजी घेण्यात यावी, असे सर्व जिल्ह्यातील जबाबदार अधिकाऱ्यांना जीव्हीव्ही सरमा यांनी सांगितले. तसेच, औद्योगिक ऑन-साइट आपत्ती व्यवस्थापनाची योजना सुनिश्चित केली पाहिजे आणि मानक संचालन प्रक्रियेचे पालन केले पाहिजे, असेही जीव्हीव्ही सरमा यांनी म्हटले आहे.
आणखी बातम्या...
भारत-चीन सैनिकांमध्ये संघर्ष, सीमेवर काहीकाळ तणावाची परिस्थिती
CoronaVirus : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बराक ओबामा भडकले; फोन कॉल लीक
पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा भारताचा प्लॅन तयार; पाकिस्तान दहशतीखाल