Lokmat Money > बिझनेस न्यूज > झोमॅटोच्या IPO ची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; पहिल्याच दिवशी १८ जण कोट्यधीश

झोमॅटोच्या IPO ची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; पहिल्याच दिवशी १८ जण कोट्यधीश

Zomato Ipo: गेल्या काही महिन्यांत अनेकविध कंपन्यांनी IPO शेअर बाजारात सादर केल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 12:42 PM2021-07-24T12:42:25+5:302021-07-24T12:49:48+5:30

Zomato Ipo: गेल्या काही महिन्यांत अनेकविध कंपन्यांनी IPO शेअर बाजारात सादर केल्याचे पाहायला मिळाले.

after zomato ipo debut 18 investors become millionaires | झोमॅटोच्या IPO ची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; पहिल्याच दिवशी १८ जण कोट्यधीश

झोमॅटोच्या IPO ची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; पहिल्याच दिवशी १८ जण कोट्यधीश

नवी दिल्ली: आताच्या शेअर बाजार विक्रमी घोडदौड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत अनेकविध कंपन्यांनी IPO शेअर बाजारात सादर केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, झोमॅटोने शेअर बाजारात एन्ट्री घेताच गुंतवणूकदार मालामाल झाल्याचे पाहायला मिळत असून, केवळ एका दिवसात १८ जण कोट्यधीश झाल्याची माहिती मिळाली आहे. (after zomato ipo debut 18 investors become millionaires)

झोमॅटोच्या शेअरची शुक्रवारी शेअर बाजारात नोंदणी झाली. कंपनीचा शेअर इश्यू प्राइसच्या तुलनेत ५० टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला आहे. यातून कंपनीचे वरिष्ठ कर्मचारी अब्जाधीश बनले आहेत. झोमॅटोच्या आयपीओ लिस्टिंगनंतर १८ जणांची मालमत्ता १० लाख डॉलर्सवर गेली आहे. झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह संस्थापक दीपेंद्र गोयल यांची संपत्ती ४६५० कोटींपर्यंत वाढली आहे. दीपेंद्र यांनी झोमॅटोमध्ये ५.५ टक्के हिस्सेदारी आहे.

“स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ‘शतजन्म शोधिताना’ अजूनही रोज १० ते १२ वेळा ऐकतो”: संजय राऊत

नियोजित वेळेआधीच भांडवली बाजारात प्रवेश केला

झोमॅटोने नियोजित वेळेआधीच भांडवली बाजारात प्रवेश केला आहे. गुंजन पाटीदार यांना ही प्रचंड फायदा झाला आहे. गुंजन पाटीदार देखील झोमॅटोचे सहसंस्थापक आहेत. पाटीदार यांच्याकडील शेअर आणि 'ई-साॅप'चे एकूण मूल्य ३६३ कोटी इतके वाढले आहे. याशिवाय कंपनीचे बिझनेस हेड असलेल्या मोहित गुप्ता यांची मालमत्ता १९५ कोटी इतकी वाढली आहे. झोमॅटोचे पुरवठा विभाग प्रमुख असलेल्या गौरव गुप्ता यांच्याकडील शेअरचे एकूण मूल्य १७९ कोटी इतके वाढले आहे. 

Airtel-Vi ला सुप्रीम कोर्टाचा झटका; १.५ लाख कोटींची थकबाकी, ‘त्या’ याचिका फेटाळल्या

प्रवर्तक आणि वरिष्ठ अधिकारी कोट्यवधीश

कंपनीच्या आणखी एक संस्थापिका असलेल्या आकृती चोप्रा यांच्याकडील शेअरचे एकूण मूल्य १४९ कोटी इतके वाढले आहे. झोमॅटोचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर अक्षांत गोयल यांच्याकडील शेअरचे मूल्य ११४ कोटी इतके झाले आहे. झोमॅटोमध्ये हिस्सेदारी असलेले प्रवर्तक आणि वरिष्ठ अधिकारी कोट्यवधीश बनले आहे. २०१९ मध्ये झोमॅटोने फिड इंडिया या एनजीओचे अधिग्रहण केले होते. या फिड इंडियाच्या संस्थापक अंकित क्वात्रा यांच्याकडील शेअरचे मूल्य १०५ कोटी झाले आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी झोमॅटोच्या शेअरची नोंदणी झाली. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) झोमॅटो ५१.३२ टक्के वाढीव दराने ११५ रुपयावर सूचीबद्ध झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर तो ५२.६३ टक्के वाढीव किमतीत ११६ रुपयांवर खुला झाला. या इश्यूसाठी कंपनीने प्रती शेअर ७२ ते ७६ रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता.
 

Web Title: after zomato ipo debut 18 investors become millionaires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.