Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची पुन्हा आपटी

सेन्सेक्सची पुन्हा आपटी

बुधवारी शेअर बाजार पुन्हा एकदा मोठ्या आपटीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४१८ अंकांनी घसरून २४,0६२.0४ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा २0 महिन्यांचा नीचांक ठरला आहे.

By admin | Published: January 21, 2016 03:14 AM2016-01-21T03:14:29+5:302016-01-21T03:14:29+5:30

बुधवारी शेअर बाजार पुन्हा एकदा मोठ्या आपटीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४१८ अंकांनी घसरून २४,0६२.0४ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा २0 महिन्यांचा नीचांक ठरला आहे.

Against the Sensex | सेन्सेक्सची पुन्हा आपटी

सेन्सेक्सची पुन्हा आपटी

मुंबई : बुधवारी शेअर बाजार पुन्हा एकदा मोठ्या आपटीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४१८ अंकांनी घसरून २४,0६२.0४ अंकांवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा २0 महिन्यांचा नीचांक ठरला आहे.
१६ मे २0१४ रोजी नंतरची ही सेन्सेक्सची सर्वांत खालची पातळी ठरली आहे. याच दिवशी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले होते. जागतिक पातळीवरील आर्थिक वाढीची चिंता, तसेच पुन्हा एकदा २८ डॉलरच्या खाली गेलेल्या कच्च्या तेलाच्या किमती ही बाजाराच्या घसरणीची प्रमुख कारणे आहेत. रुपयाच्या घसरणीनेही त्याला हातभार लावला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी नरमाईने उघडला होता. त्यानंतर तो सातत्याने घसरत राहिला. एका क्षणी तो २४ हजार अंकांच्याही खाली गेला होता. सत्राच्या अखेरीस तो २४,0६२.0४ अंकांवर बंद झाला. ४१७.८0 अंकांची अथवा १.७१ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली. आदल्या सत्रात सेन्सेक्सने २९१.४७ अंकांची वाढ मिळविली होती.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,३00 अंकांच्या खाली घसरला होता. तथापि, नंतर तो या पातळीच्या थोडासा वर बंद झाला. १२५.८0 अंकांची अथवा १.६९ टक्क्यांची घसरण नोंदवून तो ७,३0९.३0 अंकांवर बंद झाला.
क्षेत्रनिहाय पातळीवर बीएसई रिअल्टी सर्वाधिक ३.४९ टक्क्यांनी घसरला. त्या खालोखाल मेटल, पीएसयू, पॉवर, बँकिंग आणि तेल व गॅस या क्षेत्रांचे निर्देशांक घसरले. व्यापक बाजारांतही हाच कल दिसून आला. स्मॉलकॅप २.0४ टक्क्यांनी, तर मीडकॅप २.0१ टक्क्यांनी घसरला.
अन्य आशियाई बाजारांपैकी शांघायचा बाजार १.0३ टक्क्यांनी घसरला. हाँगकाँगचा हँग सेंग ३.८२ टक्क्यांनी, तर जपानचा निक्केई ३.७१ टक्क्यांनी घसरला. युरोपीय बाजारांनीही सकाळी मोठी डुबकी मारल्याचे दिसून आले. बहुतांश युरोपीय बाजार सकाळी १३ महिन्यांची नीचांकी पातळी दर्शवीत होते. (वृत्तसंस्था)विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतल्यामुळे बाजारात घसरण झाल्याचे ब्रोकरांनी सांगितले. रिलायन्स इंडस्ट्रीजला घसरणीचा सर्वाधिक ३.७६ टक्के फटका बसला.त्या खालोखाल अदाणी पोर्टस्, एसबीआय, कोल इंडिया, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एनटीपीसी, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, हिंद युनिलिव्हर यांचे समभाग घसरले. सेन्सेक्समधील ३0 पैकी २७ कंपन्यांचे समभाग घसरले. फक्त बजाज आॅटो, हीरो मोटोकॉर्प आणि विप्रो यांचे समभाग अल्प प्रमाणात वाढले.

Web Title: Against the Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.