Lokmat Money > बिझनेस न्यूज > भंगारात काढण्यासाठी वाहनांचे वय निश्चित नाही; परिवहन मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

भंगारात काढण्यासाठी वाहनांचे वय निश्चित नाही; परिवहन मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

केंद्र सरकारने जुनी वाहने भंगारात काढण्यासंदर्भात धाेरण आखले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 10:06 AM2023-03-17T10:06:41+5:302023-03-17T10:07:19+5:30

केंद्र सरकारने जुनी वाहने भंगारात काढण्यासंदर्भात धाेरण आखले आहे.

age of vehicles for scrapping is not fixed clarification given by ministry of transport | भंगारात काढण्यासाठी वाहनांचे वय निश्चित नाही; परिवहन मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

भंगारात काढण्यासाठी वाहनांचे वय निश्चित नाही; परिवहन मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्र सरकारने जुनी वाहने भंगारात काढण्यासंदर्भात धाेरण आखले आहे. त्यानुसार, काही अपवाद वगळता १५ वर्षांपेक्षा जुनी सर्व सरकारी वाहने भंगारत काढण्यात येणार आहे. मात्र, इतर वाहनांसाठी अद्याप वयाेमर्यादा निश्चित केलेली नाही, असे केंद्रीय परिवहन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ट्रॅक्टरचे आयुर्मान १० वर्षे निश्चित करण्यात आल्याबाबत साेशल मीडियावर काही पाेस्ट व्हायरल झाल्या हाेत्या. त्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे परिवहन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मंत्रालयाने सांगितले, की कृषि टॅक्टर हे एक गैर-परिवहन श्रेणीतील वाहन आहे. त्याची सुरूवातीला १५ वर्षांसाठी नाेंदणी हाेते. त्यानंतर एकदा पाच वर्षांसाठी नाेंदणीचे नुतनीकरण करता येते. हाच नियम इतर खासगी वाहनांसाठी आहे. सरकारने काही सरकारी वाहने वगळता इतर काेणत्याही वाहनाची भंगारात काढण्यासाठी आयुर्मान निश्चित केलेले नाही. भंगार धाेरणातही वाहनांच्या आयुर्मानाबाबत निर्णय घेतलेला नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: age of vehicles for scrapping is not fixed clarification given by ministry of transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.