Join us

भंगारात काढण्यासाठी वाहनांचे वय निश्चित नाही; परिवहन मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 10:06 AM

केंद्र सरकारने जुनी वाहने भंगारात काढण्यासंदर्भात धाेरण आखले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्र सरकारने जुनी वाहने भंगारात काढण्यासंदर्भात धाेरण आखले आहे. त्यानुसार, काही अपवाद वगळता १५ वर्षांपेक्षा जुनी सर्व सरकारी वाहने भंगारत काढण्यात येणार आहे. मात्र, इतर वाहनांसाठी अद्याप वयाेमर्यादा निश्चित केलेली नाही, असे केंद्रीय परिवहन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ट्रॅक्टरचे आयुर्मान १० वर्षे निश्चित करण्यात आल्याबाबत साेशल मीडियावर काही पाेस्ट व्हायरल झाल्या हाेत्या. त्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचे परिवहन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मंत्रालयाने सांगितले, की कृषि टॅक्टर हे एक गैर-परिवहन श्रेणीतील वाहन आहे. त्याची सुरूवातीला १५ वर्षांसाठी नाेंदणी हाेते. त्यानंतर एकदा पाच वर्षांसाठी नाेंदणीचे नुतनीकरण करता येते. हाच नियम इतर खासगी वाहनांसाठी आहे. सरकारने काही सरकारी वाहने वगळता इतर काेणत्याही वाहनाची भंगारात काढण्यासाठी आयुर्मान निश्चित केलेले नाही. भंगार धाेरणातही वाहनांच्या आयुर्मानाबाबत निर्णय घेतलेला नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :वाहन उद्योग