नवी दिल्ली : ग्लोबल इन्फोसिस व लिबर्टी ग्लोबल यांच्यामधील १.६ अब्ज डॉलरचा समझोता करार यामुळे लिबर्टी ग्लोबलला इन्फोसिस सुरुवातीची पाच वर्षे सेवा प्रदान करणार आहे.
आठ वर्षांसाठी हा करार असून एकूण २.३ अब्ज यूरोचा तो असेल. सुरुवातीला पाच वर्षांसाठी हा करार राहील तर त्यानंतर आठ वर्षे व नंतर तो वाढवण्याचाही पर्याय या करारानुसार खुला ठेवण्यात आला आहे. लिबर्टी ग्लोबल ही कंपनी व्हिडीओ, ब्रॉडबँड व दळणवळण क्षेत्रातील आहे. तर इन्फोसिस ही आयटी क्षेत्रातील नामवंत भारतीय कंपनी आहे. या करारामुळे जागतिकस्तरावर वृद्धी करण्यासाठी आम्हाला मदत होणार आहे, असे इन्फोसिसचे मुख्य कार्यपालक अधिकारी सलील पारेख यांनी सांगितले.