Join us

एमएसएमईच्या मदतीसाठी जागतिक बॅँकेबरोबर करार, ७५० दशलक्ष डॉलरची मिळणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 1:14 AM

जागतिक बॅँकेच्या एमएसएमई तातडीच्या मदत कार्यक्रमांतर्गत हा करार करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत कोविड-१९ च्या साथीमुळे अडचणीत आलेल्या एमएसएमईना पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९च्या साथीमुळे अडचणीमध्ये आलेल्या छोट्या, लहान व मध्यम उद्योगांना अर्थसाहाय्य करण्याला निधी कमी पडू नये यासाठी भारत सरकारने जागतिक बॅँकेबरोबर ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या करारावर सह्या केल्या आहेत. यामुळे या उद्योगांना पुरेशा प्रमाणामध्ये अर्थसाहाय्य करणे सरकारला शक्य होणार आहे.जागतिक बॅँकेच्या एमएसएमई तातडीच्या मदत कार्यक्रमांतर्गत हा करार करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत कोविड-१९ च्या साथीमुळे अडचणीत आलेल्या एमएसएमईना पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. देशातील १.५ दशलक्ष एमएसएमईना या रकमेमधून तातडीचे खर्च भागविण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे. या उद्योगांना कोणत्याही स्वरुपाची अडचण येऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.भांडवलासाठी कर्ज देणारकोविड-१९ च्या साथीमुळे झालेल्या नुकसानानंतर एमएसएमईना भांडवल आणि नित्य खर्चासाठी रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी बिगर बॅँकिंग वित्तीय संस्थांनाही या उद्योगांना मदतीसाठीचे निर्देश सरकारने दिले आहेत.

टॅग्स :अर्थव्यवस्थावर्ल्ड बँकभारतकोरोना वायरस बातम्या