नवी दिल्ली - वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. विशेषकरून नाशवंत शेतमालाची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार शेतमालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल आणि कृषी उडाण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेनुसार दूध, मांस, मासे यासह अन्य नाशवंत कृषी पदार्थ खराब होण्यापासून वाचवण्यासाठी तसेच त्यांची वेगाने वाहतूक व्हावी यासाठी वातानुकूलित किसान रेल कोच चालवण्यात येणार आहेत. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या मालवाहतुकीसाठी कृषी उडाण योजनासुद्धा सुरू करण्यात येणार असून, याअंतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विमानसेवा पुरवली जाणार आहे. या सेवेचे नियंत्रण कृषी मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे.
Budget 2020: शेतकऱ्यांसाठी विशेष रेल्वे आणि विमान सेवा, अर्थसंकल्पात मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 12:55 PM
Agriculture Budget 2020 : वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
ठळक मुद्देनाशवंत शेतमालाची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अर्थसंकल्पामधून मोठी घोषणादूध, मांस, मासे यासह अन्य नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीसाठी किसान रेलकृषी उडाण योजनेचीही घोषणा