Join us

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी क्षेत्राची तरतूद केली दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 3:33 AM

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी क्षेत्राची अर्थसंकल्पीय तरतूद आपल्या सरकारने दुपटीने वाढवून २.१२ लाख कोटी रुपये केली आहे

नवी दिल्ली : शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी क्षेत्राची अर्थसंकल्पीय तरतूद आपल्या सरकारने दुपटीने वाढवून २.१२ लाख कोटी रुपये केली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. २०२२पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यात येईल, याचा पुनरुच्चारही मोदी यांनी केला.सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मोदी सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संपर्क साधत आहेत. आज त्यांनी देशातील ६०० पेक्षा जास्त जिल्ह्यांतील शेतकºयांशी संपर्क साधला. त्यात ते म्हणाले की, २०२२पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मी जेव्हा शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत बोलतो तेव्हा अनेक लोक खिल्ली उडवतात. हे शक्यच नाही, अवघड आहे, असे लोक म्हणतात. या लोकांनी विनाशकारी वातावरण तयार केले आहे; पण आमचा शेतकºयांवर विश्वास असल्यामुळे आम्ही ठाम निश्चय केला आहे.मोदी म्हणाले की, उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही शेतीला लागणाºया निविष्टांच्या किमती कमी करीत आहोत. शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, हंगामानंतरचा तोटा कमी करणे, उत्पन्नाचे पर्यायी स्रोत तयार करण्यासाठी आम्ही धोरणे आखत आहोत. २०१८-१९मध्ये आम्ही सर्व शेतमालाच्या किमान आधारभूत किमती उत्पादन खर्चापेक्षा किमान दीडपट अधिक ठरविल्या आहेत.पाच वर्षांपूर्वी कृषीची अर्थसंकल्पीय तरतूद १.२१ लाख कोटी होती. २०१४ ते २०१९ या काळात ती २.१२ लाख कोटींवर नेली आहे. १२.५ लाख शेतकºयांना पहिल्यांदाच माती आरोग्य कार्ड दिले आहे. पीक विम्याचा हप्ता कमी केला असून, विमा संरक्षण ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. ईशान्येत २१ लाख हेक्टर जमीन सेंद्रिय शेतीखाली आणली आहे, असे त्यांनी सांगितले.