Join us

फुलशेतीमुळे मजुराचे पालटले नशीब, आता महिनाभरात दीड लाखांचे उत्पन्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 5:23 PM

विशेष म्हणजे बहिणीच्या सांगण्यावरून त्यांनी झेंडू आणि गुलाबाच्या फुलांची लागवड सुरू केली आहे. त्यामुळे त्यांची बंपर कमाई होत आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी केवळ पारंपारिक पिके घेतात, असे लोकांना वाटते, पण तसे नाही. येथील शेतकरीही आधुनिक पद्धतीने फुलांची लागवड करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. असेच एक शेतकरी गजानन माहोरे. गजानन माहोरे यांनी फुलांची लागवड करून लोकांसमोर आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे बहिणीच्या सांगण्यावरून त्यांनी झेंडू आणि गुलाबाच्या फुलांची लागवड सुरू केली आहे. त्यामुळे त्यांची बंपर कमाई होत आहे.

किसान तकच्या वृत्तानुसार, शेतकरी गजानन माहोरे हे हिंगोली जिल्ह्यातील दिग्रस गावचे रहिवासी आहेत. ते 6 एकर जमिनीवर विविध प्रकारच्या फुलांची लागवड करत आहेत. त्यामुळे त्यांना दरमहा सुमारे दीड लाखाचे उत्पन्न मिळत आहे. दरम्यान, पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो, त्यामुळे घराचा खर्च भागवणे कठीण होते. यानंतर संपूर्ण कुटुंबासह मजूर म्हणून काम करू लागलो. पण, यादरम्यान माझ्या बहिणीने फुलशेती करण्याचा सल्ला दिला. यानंतर दीड एकरात देशी गुलाब व झेंडूच्या फुलांची लागवड सुरू केली. यातून चांगली कमाई होऊ लागली, असे गजानन माहोरे यांनी सांगितले.

हिंगोलीत आठवे ज्योतिर्लिंग आहे. येथे देशभरातून भाविक येतात. तसेच, नांदेडमध्ये शीखांचे धर्मस्थळ आहे. या दोन्ही ठिकाणी फुलांना मागणी जास्त आहे. या दोन्ही ठिकाणी जाऊन फुलांच्या हारांची विक्री करतात. त्यामुळे त्यांची बंपर कमाई होत आहे, असे गजानन माहोरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे फुलांची मागणी वाढल्यावर त्यांनी लागवडीखालील क्षेत्रही वाढवले. आता ते आपली तीन एकर जमीन आणि तीन एकर भाडेतत्त्वावर घेऊन फुलांची शेती करत आहेत. ते गुलाब, निशिगंधा, गलांडा, झेंडू अशा 10 प्रकारच्या फुलांची लागवड करत आहेत. यामुळे शेतकरी गजानन माहोरे यांना दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

याचबरोबर, बाजारातील मागणीनुसार फुलांची लागवड केल्याचे गजानन माहोरे म्हणतात. ते ठिबकद्वारे झाडांना पाणी देतात, यामुळे पाण्याची बचतही होत आहे. शेतकरी बांधवांना कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर ते फुलांची लागवड करू शकतात, असे गजानन माहोरे सांगतात.

टॅग्स :शेतकरीव्यवसाय