अकोला : कृषी क्षेत्रापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, जीआयएसच्या (जिओग्राफीकल इन्फर्मेशन सिस्टिम) सहाय्याने रिमोट सेन्सींगचा वापर कृषी क्षेत्रात वाढला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ही प्रणाली विकसीत करण्यात आली असून, या तंत्रज्ञानाचा वापर करू न संशोधनाची दिशा ठरवली जात आहे.शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल होत असून, शेतकरी आधुनिक शेती करण्याकडे वळला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करू न जास्त उत्पन्नाची शेती करण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे. नवीन पध्दतीची शेती करताना शेतकरी संगणकाव्दारे सिंचन, द्रव स्वरू पातील खते देण्याचे तंत्रज्ञान अवलंबत आहेत. त्यासाठी रिमोट सेन्सींग आणि जीआयएसचा उपयोग वाढला असून, या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषी क्षेत्राचे नियोजन करण्यात येतआहे.या यंत्रामध्ये सेन्सर बसवून पृथ्वीवरील भौगोलिक संरचनांचा अभ्यास केला जातो. या तंत्रज्ञानाव्दारे पृथ्वीवरील मोठ्या क्षेत्राचे नकाशे, वृक्ष, रस्ते, घर, नद्या, नाले तथा प्रक्षेत्राची माहिती सेन्सरद्वारे संकलीत केली जाते. त्यामुळे ही कामं होण्यास गती मिळाली आहे. या प्रणालीचा उपयोग कृषी क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून, भूमि, रोगांचे प्रमाण, सिंचनासाठी धरणातील पाण्याची उपलब्धता, नैसर्गिक खनिजे, नद्या, हिमरेषाची हालचाल, पुराची पूर्वसूचना, पिकाखालील क्षेत्र, नवक्षेत्र, झाडांच्या प्रजातींचे वितरण तसेच वणव्यावर लक्ष ठेवलेजाते. याशिवाय २४ तास अगोदर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होत असून, त्यामुळे आपत्तीच्या पूर्वसूचना देणे शक्य होत आहे.नैसर्गीक तेल, खनिजे, वायू असा विविधांगी अभ्यास व माहिती संकलीत करू न त्याचा शेती विकासासाठी वापर केला जात आहे. या जीआयएस प्रणालीचा वापर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही सुरू केला आहे.
विकसित तंत्रज्ञानावर कृषी विद्यापीठाचा भर
By admin | Published: September 25, 2014 3:22 AM