Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळीपूर्वी ICICI आणि 'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका; कर्जाचे व्याजदर वाढवले, EMI वाढणार

दिवाळीपूर्वी ICICI आणि 'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका; कर्जाचे व्याजदर वाढवले, EMI वाढणार

नवीन एमएलसीआर १ नोव्हेंबर २०२३ पासून लागू करण्यात आला आहे. बहुतांश कर्ज एका वर्षाच्या एमएलसीआरशी जोडलेली असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 01:56 PM2023-11-03T13:56:20+5:302023-11-03T13:57:19+5:30

नवीन एमएलसीआर १ नोव्हेंबर २०२३ पासून लागू करण्यात आला आहे. बहुतांश कर्ज एका वर्षाच्या एमएलसीआरशी जोडलेली असतात.

Ahead of Diwali ICICI and bank of india Government Bank Hit Customers Loan interest rate increased EMI will increase details | दिवाळीपूर्वी ICICI आणि 'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका; कर्जाचे व्याजदर वाढवले, EMI वाढणार

दिवाळीपूर्वी ICICI आणि 'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका; कर्जाचे व्याजदर वाढवले, EMI वाढणार

ICICI बँक आणि बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट्स (MCLR) वाढवले ​​आहेत. कोणत्याही कर्जाचे व्याजदर एमएलसीआरच्या आधारे ठरवले जातात. दोन्ही बँकांच्या वेबसाइटनुसार, नवीन एमएलसीआर १ नोव्हेंबर २०२३ पासून लागू करण्यात आला आहे. बहुतांश कर्ज एका वर्षाच्या एमएलसीआरशी जोडलेली असतात.

ICICI Bank चा एमएलसीआर
आयसीआयसीआय बँकेनं सर्व कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये ५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरनाईट एमएलसीआर ८.५० टक्के, एका महिन्याचा एमएलसीआर ८.५० टक्के, तीन महिन्यांचा एमएलसीआर ८.५५ टक्के, सहा महिन्यांचा एमएलसीआर ८.९० टक्के आणि एक वर्षाचा एमएलसीआर ९ टक्के करण्यात आलाय.

Bank of India चा एमएलसीआर
बँक ऑफ इंडियाने काही कालावधीसाठी एमएलसीआरवर व्याजदर वाढवले ​​आहेत. वेबसाइटनुसार, ओव्हरनाईट एमएलसीआर ७.९५ टक्के, एक महिन्याचा एमएलसीआर ८.२० टक्के, तीन महिन्यांचा एमएलसीआर ८.३५ टक्के, सहा महिन्यांचा एमएलसीआर ८.५५ टक्के, एक वर्षाचा एमएलसीआर ८.७५ टक्के आणि तीन वर्षांचा एमएलसीआर ८.९५ टक्के करण्यात आलाय.

काय होतो परिणाम?
एमएलसीआर वाढल्याचा परिणाम संबंधित व्यक्तीच्या ईएमआयवर होतो. पूर्वीच्या तुलनेत त्यांना अधिक ईएमआय भरावा लागतो. जर ईएमआय वाढला नाही, तर कर्जाचा कालावधी वाढवण्यात येतो. एमएलसीआर हा तो दर आहे, ज्याच्या खाली बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाहीत. सर्व प्रकारच्या कर्जासाठी ते एक बेंचमार्क म्हणून काम करतं.

Web Title: Ahead of Diwali ICICI and bank of india Government Bank Hit Customers Loan interest rate increased EMI will increase details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.