Lokmat Money > बिझनेस न्यूज > अहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा

अहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा

Punjab National Bank Scam : अहमदाबादच्या झोनल ऑफिसअंतर्गत अहमदाबादच्या मोठ्या कॉर्पोरेट शाखेमध्ये मेसर्स सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एसआयएल) च्या एनपीए खात्यामध्ये १२०३.२६ कोटी रुपयांच्या कर्जाच्या अफरातफरीची माहिती समोर आली आहे.

By बाळकृष्ण परब | Published: October 1, 2020 11:32 AM2020-10-01T11:32:40+5:302020-10-01T11:45:22+5:30

Punjab National Bank Scam : अहमदाबादच्या झोनल ऑफिसअंतर्गत अहमदाबादच्या मोठ्या कॉर्पोरेट शाखेमध्ये मेसर्स सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एसआयएल) च्या एनपीए खात्यामध्ये १२०३.२६ कोटी रुपयांच्या कर्जाच्या अफरातफरीची माहिती समोर आली आहे.

Ahmedabad-based company sues Punjab National Bank for 1200 crores Rupees | अहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा

अहमदाबादमधील कंपनीने पंजाब नॅशनल बँकेला घातला हजारो कोटींचा गंडा

Highlightsसिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एसआयएल) च्या एनपीए खात्यामध्ये १२०३.२६ कोटी रुपयांच्या कर्जाच्या अफरातफरीची माहिती सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी ही कपडा आणि धागा बनवते. ही कंपनी प्लॅस्टिकच्या पाण्याचे टँक बनवणाऱ्या सिंटेक्स समुहाशी संबंधितकोरोना विषाणूच्या फैलावामुळे निर्माण झालेले संकट आणि त्यामुळे कमकुवत झालेला विकास दर याच्या पार्श्वभूमीवर सध्या कर्जदारांकडून येणे रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत

अहमदाबाद - पंजाब नॅशनल बँकेल अहमदाबादमधील सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सुमारे १२०० कोटी रुपयांच्या गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या रिपोर्टमधून हा घोटाळा उघडकीस आली आहे. या कंपनीच्या कर्ज पुनर्गठनाच्या प्रस्तावाला कर्जदात्यांनी नाकारले होते. बुधवारी एका रेग्युलेटरी फायलिंगवेळी सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पीएनबीने सांगितले की, त्यांनी फायलिंग कायद्यानुसार आवश्यक २१५.२१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अहमदाबादमधील आपल्या कॉर्पोरेट बँकिंग शाखेत झालेल्या अफरातफरीबाबत माहिती मिळाल्यानंतर हे पाऊल उचलल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पंजाब नॅशनल बँकेवने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये सांगितले की, अहमदाबादच्या झोनल ऑफिसअंतर्गत अहमदाबादच्या मोठ्या कॉर्पोरेट शाखेमध्ये मेसर्स सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एसआयएल) च्या एनपीए खात्यामध्ये १२०३.२६ कोटी रुपयांच्या कर्जाच्या अफरातफरीची माहिती समोर आली आहे.

सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी ही कपडा आणि धागा बनवते. ही कंपनी प्लॅस्टिकच्या पाण्याचे टँक बनवणाऱ्या सिंटेक्स समुहाशी संबंधित आहे. भारतामध्ये घरगुती सामान निर्माता म्हणून सिंटेक्स हे एक प्रसिद्ध नाव आहे. सिंटेक्स समुहाची मालकी ही सिंटेक्स प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी लिमिटेडकडे आहे. हा समूह २०१७ मध्ये सिंटेक्स इंडस्ट्रिजपासून वेगळा झाला होता.

सध्या देशातील बँका दीर्घकाळापासून सुरू असलेले कर्ज संकट, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे निर्माण झालेले संकट आणि त्यामुळे कमकुवत झालेला विकास दर याच्या पार्श्वभूमीवर सध्या कर्जदारांकडून येणे रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, पंजाब नॅशनल बँकेने अहमदाबादमधील या कंपनीने कर्जामध्ये १२०० रुपयांची अफरातफर केल्याचे नमूद केले आहे. सिंटेक्स इंडस्ट्रीजने १२०३ कोटी रुपयांची अपरातफर केल्याचे समोर आल्याचे पीएनपीने म्हटले आहे.

Web Title: Ahmedabad-based company sues Punjab National Bank for 1200 crores Rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.