Lokmat Money > बिझनेस न्यूज > संपूर्ण जगात वाजतोय या स्टॉकचा डंका, कुणी केली पृथ्वीवरचा सर्वात महत्वाचा शेअर म्हणून घोषणा? जाणून घ्या

संपूर्ण जगात वाजतोय या स्टॉकचा डंका, कुणी केली पृथ्वीवरचा सर्वात महत्वाचा शेअर म्हणून घोषणा? जाणून घ्या

या कंपनीच्या शेयरमधील तेजीमुळे अमेरिकन शेअर बाजारही (US Stock Market) उत्साहात दिसत आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 04:39 PM2024-02-22T16:39:01+5:302024-02-22T16:39:35+5:30

या कंपनीच्या शेयरमधील तेजीमुळे अमेरिकन शेअर बाजारही (US Stock Market) उत्साहात दिसत आहे.  

ai chip maker nvidia's share popular all over the world, who announced it as the most important share on earth? find out | संपूर्ण जगात वाजतोय या स्टॉकचा डंका, कुणी केली पृथ्वीवरचा सर्वात महत्वाचा शेअर म्हणून घोषणा? जाणून घ्या

संपूर्ण जगात वाजतोय या स्टॉकचा डंका, कुणी केली पृथ्वीवरचा सर्वात महत्वाचा शेअर म्हणून घोषणा? जाणून घ्या

चिप तयार करणारी कंपनी एनव्हिडिया (NVIDIA) सध्या जबरदस्त चर्चेत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी बघायला मिळत आहे. ही तेजी पाहता, अमेरिकेतील दिग्गज फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी गोल्डमॅन सॅक्सच्या (Goldman Sachs) ट्रेडिंग डेस्कने या शेअरला पृथ्वीवरील सर्वात महत्वाचा स्टॉक म्हणूनही घोषित करून टाकले आहे. 

महत्वाचे म्हणजे, Chip Manufactrer एनव्हिडिया नुकतीच मार्केट कॅपिटलायझेशनच्या बाबतीत गूगल सारख्या कंपनीपेक्षाही पुढे निघून गेली आहे. एवढेच नाही, तर या कंपनीच्या शेयरमधील तेजीमुळे अमेरिकन शेअर बाजारही (US Stock Market) उत्साहात दिसत आहे.  

Amazon आणि Google लाही टाकलं मागे! -
ब्लूमबर्गनुसार, AI Chip तयार करणाऱ्या या कंपनीला गेल्या वर्षात लक्षणीय ग्रोथ तर मिळालीच. शिवाय या वर्षात म्हणजेच 2024 मध्ये नॅस्डॅक 100 इंडेक्सच्या आतापर्यंतच्या वाढीत एक तृतिआंश वाढ NVIDIA मुळे झाली आहे. महत्वाचे म्हणजे, एनव्हिडिया गेल्या आठवड्यात मंगळवारी मार्केट कॅपच्या बाबतीत गूगल (Google) ची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंक आणि जेफ बेजोस (Jeff Bezos) यांच्या नेतृत्वाखालील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अमेजन (Amazon) पेक्षाही पुढे गेली आहे. याच बरोबर ही कंपनी आता जगातील पाचव्या क्रमांकाची आणि अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात व्हॅल्यूएबल कंपनी बनली आहे. कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन वाढून 1.78 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे.

US मार्केटमध्ये उत्साह -
एनव्हिडियामुळे अमेरिकन बाजारातही तेजी दुसून येत आहे. खरे तर, बाजारातील या उत्साहा मागचे मुख्य कारण NVIDIA Q4 Results असल्याचे मानले जात आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीने 22.1 अब्ज डॉलर एवढा रेव्हेन्यू आणि 5.16 डॉलर EPS नोंदवला आहे. जो यासंदर्भात लावल्या जात असलेल्या पूर्वानुमानापेक्षा अधिक चांगला आहे. महत्वाचे म्हणजे, अॅनालिस्ट्सनी एनव्हिडियाचा रेव्हेन्यू 20.55 अब्ज डॉलर आणि ईपीएस 4.64 डॉलर राहील असा अंदाज वर्तवला होता. या परिणामांनंतर डॉओ जोन्स 0.13 टक्के आणि एसअँडपी 500 इंडेक्स 0.12 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आहे.
 

Web Title: ai chip maker nvidia's share popular all over the world, who announced it as the most important share on earth? find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.