नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) कंपन्यांची उत्पादकता वाढणार आहे. त्यामुळे ४० टक्के कर्मचारी बेरोजगार होण्याची भीती व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी यास दुजोरा दिला आहे.
दावोस येथील जागितक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेसाठी रवाना हाेण्यापूर्वी जॉर्जिव्हा यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर एआयमुळे ४० टक्के नोकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. विकसनशील देशांवरही एआयचा प्रभाव राहील. मात्र, त्याची तीव्रता विकसित राष्ट्रांच्या तुलनेत थोडी कमी असेल.
गरीब देशांना उपयुक्त
नाणेनिधीच्या अहवालानुसार, एआयच्या नकारात्मक प्रभावाबरोबरच सकारात्मक प्रभावही दिसून येईल.
उत्पादकतेत वाढ हा एआयचा सर्वांत मोठा लाभ असेल. लोकांचे उत्पन्नही त्यामुळे वाढू शकेल.
जॉर्जिवा यांनी म्हटले की, कमी उत्पन्नाच्या देशांना गतीने पुढे आणावे लागेल. यासाठी त्यांनाही एआयचा लाभ मिळवून देता आला पाहिजे.