नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’चा वापर सातत्याने वाढत आहे. ‘एआय’मुळे अनेक कामे झटपट हाेत आहेत. ‘एआय’चा करदात्यांना दुहेरी फायदा हाेत आहे. आयकर विवरण भरणे आणि कर परतावा मिळविण्याचे काम सहज हाेऊ लागले आहे. मात्र, त्याचवेळी करचाेरी करणाऱ्यांना याच ‘एआय’मुळे घाम फुटणार आहे.
आयकर खाते एआयचा वापर करून करचाेरांना पकडणार आहे. विविध धर्मदाय संस्थांना आणि राजकीय पक्षांना दान देऊन कर सवलत घेणारे आयकर खात्याच्या रडारवर आहेत. ‘एआय’मुळे करदात्यांचे काम साेपे झाले आहे. तसेच इतर स्राेतांमार्फत मिळणारे उत्पन्नही ओळखले जाते. त्यामुळे आयकर विभागाने एआयच्या माध्यमातून करचुकवेगिरी करणाऱ्यांना हेरले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या आयकर विवरणांचे फेरमूल्यांकन करण्यात येत आहे.
सरकारच्या झाेळीत पावणेचार लाखांचा करयावर्षी ११ टक्के वाढ झाली आहे. १७ जूनपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संग्रह ३.८० लाख काेटी एवढा झाला आहे. त्यात आगावू कर संग्रहाचा वाटा जास्त आहे.
अनेकांना पाठविल्या नाेटिसासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मार्च ते १० जून या कालावधीपर्यंत शेकडाे नाेकरदारांना नाेटिसा पाठविल्या आहेत. उत्पन्नाच्या तुलनेत दानाचे प्रमाण २०१८-१९ या आर्थिक वर्षात कमी आहे, अशा लाेकांची ओळख पटविण्यात आली आहे.कलम ८० जी अंतर्गत राजकीय पक्ष तसेच धर्मदाय संस्थांना दान देताना ५०-१०० टक्के सवलतीचा दावा केला जाताे. अनेकांनी फार माेठी रक्कम दान केल्याचा दावा केला आहे. अशा प्रकरणांमध्ये नाेटिसा पाठविल्या आहेत.
असे हाेते फेरमूल्यांकन५० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांसाठी १० वर्षे आणि ५० लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी ८ वर्षांच्या आत आयकर विवरणाचे फेरमूल्यांकन करता येते. सहायक आयुक्त किंवा उपायुक्तांना करचाेरीबाबत ठाेस तथ्ये आढळल्यास नाेटीस पाठविता येते. धर्मदाय संस्थांना एक विशिष्ट ओळख संख्या मिळविणे बंधनकारक केले हाेते.