Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअर आशिया लाच प्रकरण तापले

एअर आशिया लाच प्रकरण तापले

एअर आशिया आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातील लाचप्रकरणी सीबीआयने टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 05:24 AM2018-05-31T05:24:36+5:302018-05-31T05:24:36+5:30

एअर आशिया आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातील लाचप्रकरणी सीबीआयने टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Air Asia bribery case was heated | एअर आशिया लाच प्रकरण तापले

एअर आशिया लाच प्रकरण तापले

मुंबई : एअर आशिया आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातील लाचप्रकरणी सीबीआयने टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे संबंध
आता टाटा ट्रस्टसारख्या देशातील सर्वात मोठ्या ट्रस्टपर्यंत येऊन ठेपल्याने प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
आंतरराष्टÑीय मार्गांचा परवाना मिळविण्यासाठी नागरी हवाई वाहतूक नियम बदलण्याबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांना लाच दिल्याप्रकरणी सीबीआयने एअर आशियाचे संस्थापक अध्यक्ष टोनी फर्नांडीज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात टाटा ट्रस्टचे विश्वस्त वेंकटरामण यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. एअर आशियामध्ये टाटा समुहाची ४९ गुंतवणूक असून वेंकटरामण हे कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक आहेत. त्यांच्याकडे कंपनीचे १.५० टक्के समभाग आहेत. पण त्यांचे नावही या लाच प्रकरणात आल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Air Asia bribery case was heated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.