Lokmat Money > बिझनेस न्यूज > Grob G 180 ELINT : हवाई दलाला मिळणार TATAची 'ताकद', बनवणार 'मेड-इन-इंडिया' ELINT विमान; पाक-चीनची झोप उडणार!

Grob G 180 ELINT : हवाई दलाला मिळणार TATAची 'ताकद', बनवणार 'मेड-इन-इंडिया' ELINT विमान; पाक-चीनची झोप उडणार!

Grob G 180 ELINT : टाटा अॅडवान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) २०२६ पर्यंत आपलं पहिलं ग्रोब G180 विमान लॉन्च करून भारताच्या संरक्षण क्षेत्रात उंच उडी घेण्यास तयार आहे. पाहा काय आहे यात विशेष?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 08:56 AM2024-08-08T08:56:52+5:302024-08-08T09:04:32+5:30

Grob G 180 ELINT : टाटा अॅडवान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) २०२६ पर्यंत आपलं पहिलं ग्रोब G180 विमान लॉन्च करून भारताच्या संरक्षण क्षेत्रात उंच उडी घेण्यास तयार आहे. पाहा काय आहे यात विशेष?

Air Force to get TATA s strength make Made in India grob G180 ELINT aircraft Pak China in tension | Grob G 180 ELINT : हवाई दलाला मिळणार TATAची 'ताकद', बनवणार 'मेड-इन-इंडिया' ELINT विमान; पाक-चीनची झोप उडणार!

Grob G 180 ELINT : हवाई दलाला मिळणार TATAची 'ताकद', बनवणार 'मेड-इन-इंडिया' ELINT विमान; पाक-चीनची झोप उडणार!

टाटा अॅडवान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) २०२६ पर्यंत आपलं पहिलं ग्रोब G180 विमान लॉन्च करून भारताच्या संरक्षण क्षेत्रात उंच उडी घेण्यास तयार आहे. अधिक उंचीवर उड्डाण करण्यास सक्षम असलेल्या या ट्विन इंजिनांच्या विमानांना इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स (ELINT) प्लॅटफॉर्म म्हणून काम करण्यासाठी कस्टमाईज केलं जाईल. आधुनिक सैन्यासाठी ही एक महत्त्वाची संपत्ती आहे. 

टाटा समूहाने २०२१ मध्ये जर्मन ग्रोब जी १८० एसपीएनचे इंटेलॅक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मिळवले. हा एक असा प्लॅटफॉर्म होता जो कधीही पूर्ण उत्पादनापर्यंत पोहोचला नाही. टीएएसएलनं या फाऊंडेशनचा उपयोग भारतीय गरजेनुसार स्वदेशी लष्करी विमान विकसित करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी करण्याची योजना आखली आहे.

काय आहे G180 मध्ये खास?

ग्रोब G180 प्रभावी क्षमता प्रदान करते. हे विमाम ४५,००० फूटांपर्यंत उड्डाण करू शकते. तसंच याची रेंज १,८०० नॉटिकल मैल आणि उड्डाण क्षमता सहा ते सात तास आहे. एक हजार किलोपेक्षा जास्त पेलोड क्षमता असलेलं हे विमान सेन्सर आणि उपकरणांचा मोठा समूह वाहून नेऊ शकतं. 

एलिंट प्लॅटफॉर्म म्हणून हे विमान इलेक्ट्रॉनिक सिग्नल मिळवणं, विश्लेषण करण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी सुसज्ज असेल. यामुळे शत्रूची हालचाल, हेतू आणि कारवायांबाबत महत्त्वाची गुप्तचर माहिती मिळेल. ही माहिती लष्करासाठी निर्णय घेण्यास महत्त्वाची ठरेल. लष्करी विमान विभागात टीएएसएलचा प्रवेश हा भारतीय खाजगी क्षेत्रासाठी महत्त्वाचा मैलाचा दगड आहे.

Web Title: Air Force to get TATA s strength make Made in India grob G180 ELINT aircraft Pak China in tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.