Join us

एअर इंडियाची इमारत; राज्याची सर्वांत मोठी बोली, सरकारने लावले १४०० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 4:49 AM

मुंबईच्या नरिमन पॉइंट भागातील प्रसिद्ध अशी एअर इंडियाची इमारत १४०० कोटी रुपयांना खरेदी करण्याची तयारी राज्य शासनाने दर्शविली आहे. राज्य शासनाची बोली सर्वाधिक रकमेची आहे.

मुंबई : मुंबईच्या नरिमन पॉइंट भागातील प्रसिद्ध अशी एअर इंडियाची इमारत १४०० कोटी रुपयांना खरेदी करण्याची तयारी राज्य शासनाने दर्शविली आहे. राज्य शासनाची बोली सर्वाधिक रकमेची आहे.एअर इंडिया आज ५० हजार कोटी रुपयांच्या बोजाखाली आहे. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या एअर इंडियाने ही कोंडी फोडण्यासाठी काही मालमत्ता विकायला काढली असून, त्यात मुंबईतील या २३ मजली इमारतीचा समावेश आहे. राज्य शासनाने १४०० कोटींची आॅफर दिली असताना जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने १ हजार ३७५ कोटी, तर एलआयसीने १२०० कोटी रुपयांची बोली लावली आहे. त्यामुळे राज्य शासन ही इमारत लवकरच खरेदी करण्याची दाट शक्यता आहे. या इमारतीत शासनाची अनेक कार्यालये स्थलांतरित करण्याची योजना आहे. नूतनीकरणानंतरही राज्य शासनाचे अनेक विभाग आज बाहेरील इमारतींमध्ये आहेत. त्यात वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामविकास विभागाचा समावेश आहे.सर्व कार्यालये आणणार एकाच ठिकाणीकार्यालये बाहेरच्या इमारतींत आहेत. एमएमआरडीए, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, एमआयडीसी, एमईआरसी, जल नियामक प्राधिकरण यांचा त्यात समावेश आहे.बाहेरच्या इमारतींमध्ये असलेल्या या कार्यालयांच्या भाड्यापोटी कोट्यवधी रुपये शासनाला दरवर्षी मोजावे लागतात. ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी एअर इंडियाच्या इमारतीत आणली जातील, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :एअर इंडियामहाराष्ट्र सरकार