Lokmat Money > बिझनेस न्यूज > Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!

Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेस २० डिसेंबर २०१४ पासून सुरत आणि पुणे ते बँकॉकला जोडणारी नवीन उड्डाणे सुरू करून आपले नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 12:49 PM2024-11-28T12:49:04+5:302024-11-28T12:51:00+5:30

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेस २० डिसेंबर २०१४ पासून सुरत आणि पुणे ते बँकॉकला जोडणारी नवीन उड्डाणे सुरू करून आपले नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे.

Air India Express expands network with new flights to Bangkok, Dimapur and Patna | Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!

Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!

नवी दिल्ली : टाटा समूहाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया एक्सप्रेस आपले नेटवर्क आणखी तीन शहरांमध्ये वाढवणार आहे. विमान कंपनी  पाटणा, दिमापूर (नागालँड) आणि बँकॉकसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार आहे.  एअर इंडिया एक्सप्रेस २० डिसेंबर २०१४ पासून सुरत आणि पुणे ते बँकॉकला जोडणारी नवीन उड्डाणे सुरू करून आपले नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे.

एअर इंडिया एक्सप्रेस आता ५१ शहरांना सेवा देणार!
रिपोर्टनुसार, नवीन उड्डाणासह, बँकॉक हे एअरलाइनचे ५१ वे आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थान बनेल, जे कंपनीच्या वाढीच्या धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. एअर इंडिया एक्सप्रेस आता ५१ शहरांना सेवा देणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस आता भारत, मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियातील ५१ शहरांना जोडेल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासाची वाढती मागणी पूर्ण होईल.

बँकॉकसाठी डायरेक्ट फ्लाइट
एअरलाइनच्या मते, बँकॉकसाठी फ्लाइट्स २० डिसेंबर २०२४ रोजी सुरू होणार आहे. त्यानुसार या डायरेक्ट फ्लाइट्स सुरत आणि पुण्याहून असणार आहेत. यासह दिमापूर आणि पाटणा येथे उड्डाणे सुरू करून, दिमापूर आणि गुवाहाटी आणि पाटणा आणि बेंगळुरू आणि हैदराबाद दरम्यान दररोज थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करून एअरलाइनने आपले देशांतर्गत नेटवर्क देखील मजबूत करणार आहे.

Web Title: Air India Express expands network with new flights to Bangkok, Dimapur and Patna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.