Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रॅव्हलच्या तिकिटात विमानप्रवास! देशात कुठेही फिरण्याची सुवर्णसंधी; फक्त १४९८ रुपयांपासून सुरू

ट्रॅव्हलच्या तिकिटात विमानप्रवास! देशात कुठेही फिरण्याची सुवर्णसंधी; फक्त १४९८ रुपयांपासून सुरू

Air India Express Sale : तुम्हाला स्वस्तात विमानाने प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अगदी ट्रॅव्हल प्रवासाच्या किमतीत तुम्ही हवाई उड्डाण करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 12:17 IST2025-01-12T12:16:48+5:302025-01-12T12:17:27+5:30

Air India Express Sale : तुम्हाला स्वस्तात विमानाने प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अगदी ट्रॅव्हल प्रवासाच्या किमतीत तुम्ही हवाई उड्डाण करू शकता.

air india express flash sale is offering fares starting at 1498 rupees on domestic flights | ट्रॅव्हलच्या तिकिटात विमानप्रवास! देशात कुठेही फिरण्याची सुवर्णसंधी; फक्त १४९८ रुपयांपासून सुरू

ट्रॅव्हलच्या तिकिटात विमानप्रवास! देशात कुठेही फिरण्याची सुवर्णसंधी; फक्त १४९८ रुपयांपासून सुरू

Air India Flash Sale : गुलाबी थंडी सुरू झाली असून लोकं मोठ्या संख्येने फिरायला बाहेर पडत आहेत. सगळीकडे छान माहोल तयार झाला आहे. अशा आल्हाददायक वातावरणात तुम्हालाही दूर फिरायला जावसं वाटणं साहिजक आहे. तुमची ही इच्छा आता स्वस्तात पूर्ण होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने 'फ्लॅश सेल'ची घोषणा केली आहे. यात तुम्ही १५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत विमान प्रवास करू शकता. विमान प्रवासी एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट, मोबाइल अ‍ॅप किंवा इतर प्रमुख बुकिंग प्लॅटफॉर्मवरून त्यांच्या फ्लाइटचे बुकिंग करून आकर्षक सवलत मिळवू शकता.

किती दिवस आहे ऑफर?
हा फ्लॅश सेल १३ जानेवारी २०२५ पर्यंत केलेल्या देशांतर्गत फ्लाइट बुकिंगसाठी आहे, ज्यामध्ये २४ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रवासाच्या तारखा लागू आहेत.

एअर इंडिया एक्सप्रेस देतेय अतिरिक्त फायदे?
फ्लॅश सेल व्यतिरिक्त, एअर इंडिया एक्सप्रेसने एक्सक्लुझिव्ह एक्सप्रेस लाईट भाडे १३२८ रुपयांपासून सुरू होणारी ऑफर देखील आणली आहे. एअरलाइन आपल्या वेबसाइट airindiaexpress.com वर लॉग इन करणाऱ्या सदस्यांसाठी 'सुविधा शुल्क' माफ करत आहे.

एक्सप्रेस लाइट भाड्यामध्ये मिळणार अतिरिक्त फायदे
एक्स्प्रेस लाईटच्या भाड्यात अतिरिक्त फायदे देखील समाविष्ट आहेत. यात ३ किलोपर्यंत केबिन बॅगेज कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय आणि सवलतीच्या चेक-इन बॅगेजच्या दरात प्री-बुक करण्याची सुविधा समाविष्ट आहे. याशिवाय, देशांतर्गत उड्डाणांवर १५ किलोच्या सामानासाठी १००० रुपये आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर २० किलोच्या सामानासाठी १३०० रुपयांची सुविधा मिळत आहे.

नवीन वर्षाच्या सेलमध्येही विमान कंपनीकडून स्वस्त तिकिटे
अलीकडेच एअर इंडिया एक्सप्रेसने आपला 'न्यू इयर सेल' सुरू केला होता. यामध्ये प्रवाशांना एक्सप्रेस व्हॅल्यूच्या भाड्यासाठी १५९९ रुपयांपासून सवलतीच्या दरात फ्लाइट बुक करण्याची संधी देण्यात आली होती. हा नवीन वर्ष सेल ५ जानेवारी २०२५ पर्यंत बुकिंगसाठी खुला होता. यामध्ये प्रवासी ८ जानेवारी ते २० सप्टेंबर २०२५ दरम्यान देशांतर्गत फ्लाइटमध्ये स्वस्त दरात प्रवास करू शकतात.

एक्सप्रेस भाड्यात २५% सूट
याशिवाय, एअरलाइन एक्सप्रेस बिझनेस भाड्यात २५% सूट देत आहे. या अंतर्गत, ते ३५ बोईंग ७३७-८ विमानांच्या नवीन फ्लीटमध्ये ५८ इंच पर्यंत सीट पिचसह बिझनेस क्लासच्या बरोबरीचा अनुभव प्रदान करते. ही विमाने एअर इंडिया एक्सप्रेसच्या जलद विस्तार योजनेचा भाग आहेत, दर आठवड्याला एक नवीन विमान त्याच्या ताफ्यात सामील होत आहे. लॉयल्टी सदस्य 'गॉरमेअर' जेवण, आसन निवड आणि एक्सप्रेस अहेड प्रायॉरिटी सर्व्हिसेसवर २५% सूट देखील घेऊ शकतात.

Web Title: air india express flash sale is offering fares starting at 1498 rupees on domestic flights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.