Lokmat Money > बिझनेस न्यूज > काय सांगता! फक्त १४४४ रुपयांत विमानाचं तिकिट! या कंपनीचा फ्लॅश सेल सुरू; कसं करायचं बुकिंग?

काय सांगता! फक्त १४४४ रुपयांत विमानाचं तिकिट! या कंपनीचा फ्लॅश सेल सुरू; कसं करायचं बुकिंग?

Air India Express Flash Sale : एअर इंडिया एक्सप्रेसने यावेळी फ्लॅश सेल सुरू केला आहे. या फ्लॅश सेलमुळे तुम्ही अतिशय स्वस्त दरात फ्लाइट तिकीट बुक करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:34 PM2024-11-12T13:34:12+5:302024-11-12T13:37:18+5:30

Air India Express Flash Sale : एअर इंडिया एक्सप्रेसने यावेळी फ्लॅश सेल सुरू केला आहे. या फ्लॅश सेलमुळे तुम्ही अतिशय स्वस्त दरात फ्लाइट तिकीट बुक करू शकता.

air india express starts flash sale can book flight tickets for only rs 1444 | काय सांगता! फक्त १४४४ रुपयांत विमानाचं तिकिट! या कंपनीचा फ्लॅश सेल सुरू; कसं करायचं बुकिंग?

काय सांगता! फक्त १४४४ रुपयांत विमानाचं तिकिट! या कंपनीचा फ्लॅश सेल सुरू; कसं करायचं बुकिंग?

Air India Express Flash Sale : महागड्या तिकिटांमुळे अजूनही तुमच्या पहिल्या विमान प्रवासाचं स्वप्न अधुरं राहिलं आहे का? सणासुदीच्या सीझनमुळे गेल्या काही दिवसांपासून फ्लाईट तिकिटांच्या किमतीत खूप वाढ झाली होती. पण, आता तुम्हाला स्वस्तात विमान प्रवासाची संधी मिळणार आहे. तुम्ही एअर इंडिया एक्स्प्रेसमधून (Air India Express) तुमचे फ्लाइट तिकीट बुक करू शकता. वास्तविक, एअर इंडिया एक्सप्रेसने यावेळी फ्लॅश सेल (Air India Express Flash Sale) सुरू केला आहे. या फ्लॅश सेलमुळे तुम्ही अतिशय स्वस्त दरात फ्लाइट तिकीट बुक करू शकता. यामध्ये तुम्ही १९ नोव्हेंबर २०२४ ते ३० एप्रिल २०२५ पर्यंतच्या प्रवासासाठी तुमचे फ्लाइट तिकीट बुक करू शकता.

फ्लाइटचे तिकीट फक्त १४४४ रुपयांना मिळणार
एअर इंडिया एक्सप्रेसच्या Xpress Lite ऑफरमध्ये तुम्हाला फक्त १४४४ रुपयांपासून फ्लाइट तिकीट मिळू शकते. यामध्ये एअर इंडिया एक्सप्रेसवर लॉग इन करणाऱ्यांना शून्य सेवा शुल्क ऑफर दिली जात आहे. याशिवाय, एअर इंडिया एक्सप्रेसच्या एक्सप्रेस व्हॅल्यू ऑफरमध्ये फ्लाइट तिकिटांची सुरुवातीची किंमत १५९९ रुपयांपासून सुरू होते. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. ऑफरमध्ये १३ नोव्हेंबरपर्यंतच बुकिंग करता येणार आहे.

फ्लॅश सेलचा तुम्हाला काय फायदा?
एक्सप्रेस लाइट ऑफरमध्ये ३ किलो केबिन बॅगेजचे प्री-बुक करण्याचा पर्याय देखील समाविष्ट आहे. देशांतर्गत फ्लाइटमध्ये १५ किलोसाठी फक्त १००० रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये १३०० रुपये चेक-इन बॅगेजचा समावेश आहे. याशिवाय, एअरलाइन एक्सप्रेस बिझनेसच्या प्रवासावर २५ टक्के सूट देत आहे. एअर इंडिया एक्सप्रेस लॉयल्टी सदस्यांना "गॉरमेअर" खाद्यपदार्थ, सीट आणि एक्सप्रेस अहेड सेवेवर २५% सवलत देत आहे.

Web Title: air india express starts flash sale can book flight tickets for only rs 1444

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.