Lokmat Money > बिझनेस न्यूज > Air India Flight Ticket Offer : एअर इंडियाची मोठी ऑफर; फक्त रु. 1700 मध्ये करा विमान प्रवास, जाणून घ्या डिटेल्स...

Air India Flight Ticket Offer : एअर इंडियाची मोठी ऑफर; फक्त रु. 1700 मध्ये करा विमान प्रवास, जाणून घ्या डिटेल्स...

Air India Flight Ticket Offer: या ऑफर अंतर्गत तुम्ही 24 ऑक्टोबर 2024 पर्यंतचे तिकीट बुक करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 09:21 PM2024-08-22T21:21:55+5:302024-08-22T21:22:05+5:30

Air India Flight Ticket Offer: या ऑफर अंतर्गत तुम्ही 24 ऑक्टोबर 2024 पर्यंतचे तिकीट बुक करू शकता.

Air India Flight Ticket Offer: Fly Only in Rs. 1700, Know Details | Air India Flight Ticket Offer : एअर इंडियाची मोठी ऑफर; फक्त रु. 1700 मध्ये करा विमान प्रवास, जाणून घ्या डिटेल्स...

Air India Flight Ticket Offer : एअर इंडियाची मोठी ऑफर; फक्त रु. 1700 मध्ये करा विमान प्रवास, जाणून घ्या डिटेल्स...

Air India Flight Ticket Offer : देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. रक्षाबंधनानंतर आता येत्या सोमवारी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाईल. त्यानंतर गणपती,  नवरात्र, दसरा अन् दिवाळी...या काळात तुम्ही विमानाने देशाच्या विविध भागात फिरण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा समूहाच्या Air India ने प्रवाशांसाठी नवीन ऑफर आणली आहे. यामध्ये रु. 1700 ना विमानाचे तिकीट मिळेल.

काय आहे एअर इंडियाची ऑफर ?
एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत विमान प्रवासाचा आनंद देण्यासाठी कंपनीने एक खास प्लॅन आणला आहे. या अंतर्गत तुम्हाला फक्त 1700 रुपयांना विमानाचे तिकीट मिळेल. ही ऑफर 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान खुली असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही 24 ऑक्टोबर 2024 पर्यंतची बुकिंग करू शकता. यासाठी तुम्हाला एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाईल ॲपद्वारे बुकिंग करावे लागेल.

अतिरिक्त फायदे 
एअर इंडियाने सांगितले की, जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी आणखी एक खास ऑफर आहे. यामध्ये HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे.

Web Title: Air India Flight Ticket Offer: Fly Only in Rs. 1700, Know Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.