Join us

‘गो स्लो’ आंदोलनाचा एअर इंडियाच्या उड्डाणांना फटका

By admin | Published: August 21, 2015 10:03 PM

कामगारांच्या श्रेणीतून वगळण्याविरुद्ध एअर इंडियाच्या कमांडर्सनी ‘संथ काम’(गो स्लो) आंदोलनाची घोषणा केल्यामुळे एअर इंडियाच्या

नवी दिल्ली : कामगारांच्या श्रेणीतून वगळण्याविरुद्ध एअर इंडियाच्या कमांडर्सनी ‘संथ काम’(गो स्लो) आंदोलनाची घोषणा केल्यामुळे एअर इंडियाच्या किमान ११ उड्डाणांना फटका बसला. एकट्या मुंबईतील आठ उड्डाणांना विलंब झाला.नुकसानीत असलेल्या एअर इंडियाचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती होताच एअरलाईन कमांडर्सना ‘वर्कमॅन’ श्रेणीतून वगळण्याचा आदेश श्रम मंत्रालयाने जारी केला. कमांडर्सना कामगार श्रेणीतून वगळण्यात आल्याचा अर्थ त्यांना संघटना स्थापन करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने यापूर्वी वैमानिक आणि अभियंत्यांना कामगार श्रेणीतून वगळण्याची सूचना श्रम मंत्रालयाला केली होती. वैमानिकांच्या संपांना आळा घालण्याचा त्यामागे उद्देश होता.