Air India आपल्या ग्राहकांसाठी नेहमी ऑफर देत असते. आता आणखी एक ऑफर लाँच केली आहे. कंपनीने देशांतर्गत आणि इंटरनॅशनल रुटवरती ९६ तासांची स्पेशल सेल सुरू केला आहे. या ऑफरमुळे कमी पैशात तुम्हाला प्रवास करता येणार आहे. देशांतर्गत मार्गावरील एकेरी भाडे इकॉनॉमी क्लाससाठी १,४७० रुपये आणि बिझनेस क्लाससाठी १०,१३० रुपयांपासून सुरू होते. निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवरही असेच आकर्षक भाडे उपलब्ध असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे.
भारताने चीनला टाकले मागे! चंद्रयान देशाची शान वाढवणार, ३ अंतराळयाने चंद्राभोवती सक्रिय
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी एअर इंडियाची www.airindia.com आणि मोबाईल अॅपला भेट देऊ शकता. बुकिंग सेवा पूर्ण मोफत आहे. एअर इंडियाचे फ्लाइंग रिटर्न्स मेंबर सर्व तिकिटांवर दुप्पट लॉयल्टी बोनस पॉइंट मिळवू शकतात.
एअऱ इंडिया वेबसाइट आणि मोबाईल अॅप व्यतिरिक्त, विक्री अंतर्गत बुकिंग अधिकृत ट्रॅव्हल एजंट आणि ऑनलाइन ट्रॅव्हल एजंटद्वारे थेट चॅनेल बुकिंगशी संबंधित विशेष लाभांशिवाय देखील केले जाऊ शकते. या सेल अंतर्गत जागा मर्यादित आहेत आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध आहेत.
एअरलाईन्सने या सेलची सुरुवात १७ ऑगस्टपासून केली आहे. प्रवासी निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवासी २० ऑगस्ट २०२३ पर्यंत तिकीट बुक करू शकतात. तिकिटांची विक्री २० ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहील.
Vihaan.AI. या अंतर्गत एअर इंडिया जागतिक स्तरावरील एअरलाइन बनण्याची आपली महत्त्वाकांक्षी योजना पुढे नेत आहे. एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, नवीन एअर इंडिया धाडसी, आत्मविश्वासपूर्ण आहे, एअरलाइनचा इतिहास आणि परंपरा खोलवर रुजलेल्या आहेत.
फ्लाईटसाठी बुकिंगची सुरुवात १४७० रुपयांपासून सुरू होते, एअर इंडिया फ्लाईट बुकिंगवर ३० टक्के सूट देत आहे. इकॉनॉमी आणि बिझनेस केबिनसाठी सूट देण्यात आली आहे.
१ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ (भारत आणि सार्क देशांसाठी उड्डाणे) १५ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ (युरोप/यूके, दक्षिण-पूर्व आशिया, आखाती देश, सौदी अरेबिया) या देशांचा यात समावेश आहे.