लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सरकारी मालकीची नागरी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया सात मालमत्ता विकून ८0 कोटी रुपये उभे करणार आहे. यात काही जमिनींचा समावेश आहे. एमएसटीसीमार्फत या मालमत्ता विकण्यात येणार आहेत.
मुंबई, बंगळुरू आणि त्रिवेंद्रम येथील काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी आणि फ्लॅटची विक्री करण्यात येणार आहे. सात मालमत्ता विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. त्यापोटी ८0 कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने २0१२ साली एअर इंडियासाठी वित्तीय पुनर्रचना योजना मंजूर केली होती. या योजनेनुसार एअर इंडियाच्या मालकीच्या मालमत्ताद्वारे ५ हजार कोटी रुपये उभे करण्यात येणार आहेत. मालमत्ता विकणे, भाड्याने देणे अथवा भागिदारीत विकसित करणे यांचा त्यात समावेश आहे. याच योजनेनुसार एअर इंडियाला १0 वर्षांच्या काळात ३0 हजार कोटींचे अर्थसाह्यही मिळणार आहे.
एअर इंडिया विकणार मालमत्ता
सरकारी मालकीची नागरी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया सात मालमत्ता विकून ८0 कोटी रुपये उभे करणार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2017 01:00 AM2017-05-25T01:00:22+5:302017-05-25T01:00:22+5:30