मुंबई - वाढत्या मागणीची पूर्तता करणे आणि हवाई प्रवास वाढवण्यासाठी एअर इंडियाने सध्या वापरात नसलेली १९ विमाने पुन्हा चलनात आणण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. सध्या एअर इंडियाची १९ विमाने अनेक कारणांनी वापरात नाहीत. त्यात प्रामुख्याने त्यांचे अत्यंत महाग सुटे भाग आणि खर्चीक बनलेली इंजिनांची देखभाल यांचा समावेश आहे. सध्या विमान प्रवासाला भरपूर मागणी असली तरी या व्यवसायाच्या क्षमतेला मर्यादा असल्यामुळे एअर इंडियाने किमान ५०० कोटी रुपयांची तरतूद या वापरात नसलेल्या १९ विमानांसाठी केली आहे. हवाई बाजारातील आमचा वाटा वाढविण्यासाठी व मागणीची पूर्तता करण्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.
आणखी १९ विमानांसाठी एअर इंडियाची तरतूद
वाढत्या मागणीची पूर्तता करणे आणि हवाई प्रवास वाढवण्यासाठी एअर इंडियाने सध्या वापरात नसलेली १९ विमाने पुन्हा चलनात आणण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 04:23 AM2019-05-06T04:23:52+5:302019-05-06T04:24:20+5:30