Join us

Air India च्या कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांनी खुशखबर, पगार वाढणार अन् बोनसदेखील मिळणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 5:13 PM

Air India Salary Increments:कंपनीतील सूमारे 18000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार.

Air India Salary Increments:एअर इंडियाच्या (Air India) कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसांनी आनंदाची बातमी मिळणार आहे. एअर इंडियाने कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढ आणि परफॉर्मन्स बोनस जाहीर केला आहे. दोन वर्षांपूर्वी टाटा समूहाने विमान कंपनी ताब्यात घेतली होती, त्यानंतर पहिल्यांदाच वेतनवाढ आणि परफॉर्मन्स बोनसची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

18000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार एअर इंडिया पाच वर्षांच्या परिवर्तन योजनेवर काम करत आहे. या योजनेंतर्गत कंपनी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना कंपनीसोबत कायम ठेवण्यासाठी चांगली वेतनवाढ देत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने मेहनतीच्या जोरावर प्रगती केली पाहिजे, हा कंपनीचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत एअर इंडियाने मागील कामगिरीच्या आधारे त्यांच्या अंदाजे 18,000 कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन केले आहे. 31 डिसेंबर 2023 पूर्वी सामील होणारे ग्राउंड स्टाफ, केबिन क्रू आणि पायलट यांचा वेतनवाढ प्रक्रियेत समावेश केला जात आहे.

वार्षिक कामगिरी बोनस टाटा समूहाने जानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर कंपनीतील ही पहिली पगारवाढ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी केवळ जुन्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि करार बदलण्यात आले होते. या वर्षी मूळ वेतनातील वाढीशिवाय, एअरलाइनने वैमानिकांसाठी वार्षिक परफॉर्मन्स बोनसदेखील सुरू केला आहे. हा बोनस वैयक्तिक कामगिरीच्या आधारावर दिला जाईल आणि आर्थिक वर्ष 2024-25 पासून लागू होईल.

टॅग्स :एअर इंडियाविमानटाटाकर्मचारीनोकरी