Join us

एअर इंडियाने विकली ७ हजार कोटींची विमाने

By admin | Published: November 22, 2015 11:49 PM

सरकारी मालकीची विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाने ड्रीमलायनर जातीची नऊ विमाने विकून ७ हजार कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे

नवी दिल्ली : सरकारी मालकीची विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाने ड्रीमलायनर जातीची नऊ विमाने विकून ७ हजार कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. सिंगापूरच्या एका कंपनीलाच ही विमाने विकण्यात आली असून एसएलबी करारानुसार हीच विमाने आता भाडेपट्ट्यावर वापरायलाही घेतली आहेत.एअर इंडियाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, या पैशातून ‘बोइंग ७८७-८00’ ही नवी विमाने खरेदी करण्यात येतील, तसेच आधीचे काही कर्ज फेडण्यात येईल. ‘विका आणि पुन्हा भाडेपट्ट्यावर घ्या’ (एसएलबी) या धोरणानुसार, संपत्ती विकणारी कंपनी विकलेल्या संपत्तीचा दीर्घकाळासाठी भाडेपट्ट्यावर परत घेत असते. ही संपत्ती नंतर विना मालकीची वापरत राहते. या आधी एअर इंडियाने १२ ड्रीमलायनर विमाने विकून पुन्हा भाडेपट्ट्यावर वापरायला घेतली आहेत. एअर इंडियाच्या बेड्यात १३१ विमाने आहेत. त्यात बोइंग, एअरबस आणि एटीआर, तसेच सीआरजे विमानांचा समावेश आहे.