Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअर इंडियाला हवीत ५०० नवीन विमाने, खरेदी झाल्यास जागतिक विक्रम

एअर इंडियाला हवीत ५०० नवीन विमाने, खरेदी झाल्यास जागतिक विक्रम

कोरोना संकट आटोक्यात आल्यानंतर जगभरात भारतीयांचा प्रवास वाढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 08:06 AM2023-01-18T08:06:56+5:302023-01-18T08:07:49+5:30

कोरोना संकट आटोक्यात आल्यानंतर जगभरात भारतीयांचा प्रवास वाढला आहे.

Air India wants 500 new planes on the verge of world record if bought | एअर इंडियाला हवीत ५०० नवीन विमाने, खरेदी झाल्यास जागतिक विक्रम

एअर इंडियाला हवीत ५०० नवीन विमाने, खरेदी झाल्यास जागतिक विक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संकट आटोक्यात आल्यानंतर जगभरात भारतीयांचा प्रवास वाढला आहे. देशांतर्गत प्रवासासाठीही विमानाचा पर्याय अवलंबला जाऊ लागला आहे. भारतात एअर इंडिया ५०० नवीन विमाने खरेदी करण्याच्या विचारात असल्याचे समजते. हा व्यवहार झाल्यास एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात विमानांची खरेदी करण्याची जगातील पहिलीच घटना ठरणार आहे. मात्र, विमान खरेदीच्या वृत्ताला एअर इंडिया कंपनीने अद्याप दुजोरा दिलेला नाही.

विमान निर्मितीच्या जागतिक बाजारात ५०० विमानांच्या खरेदीचे वृत्त सध्या चर्चेत आहे. ही विमान खरेदी जर प्रत्यक्षात आली, तर ती केवळ एका विमान कंपनीने केलेली खरेदी एवढी मर्यादित व्याप्ती नसेल, तर यामुळे भारतीय हवाई क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होतील, असे मत हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. प्रामुख्याने याचा फायदा अधिकाधिक परदेशी प्रवासासाठी होईल. अनेक देशांमध्ये सध्या भारताची थेट सेवा नाही. मात्र, विविध देशांत भारतीयांचा वाढलेला वावर लक्षात घेता, नवे मार्ग  गाठण्यासाठी मदत होईल आणि त्या देशांत थेट जोडणी होऊ शकेल.

  • ४०० विमाने ही प्रामुख्याने ए-३२०, ए ३२१, बोईंग मॅक्स ७३७ जातीची
  • १०० विमाने ७८७एस, ७७७ एक्स, ७७७ फ्रीटर्स, ए-३५० एअरबस या जातीची

सर्वात मोठ्या खरेदीचा विक्रम

  • ४६० अमेरिकन एअरलाइन्स
  • ३०० इंडिगो एअरलाइन्स

Web Title: Air India wants 500 new planes on the verge of world record if bought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.