Join us

एअर इंडियाच्या ताफ्यात होणार वाढ

By admin | Published: February 17, 2017 12:38 AM

एअर इंडियाने आपल्या ताफ्यात आता एअरबस ३२० विमानाचा समावेश केला आहे. या वर्षी असे आणखी १३ विमाने भाडेतत्त्वावर

नवी दिल्ली : एअर इंडियाने आपल्या ताफ्यात आता एअरबस ३२० विमानाचा समावेश केला आहे. या वर्षी असे आणखी १३ विमाने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याची माहितीही एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली. या विमानाला कमी इंधन लागते. ए ३२० निओ (नवीन इंजिन पर्याय) विमानात १६२ आसनक्षमता आहे. यात १२ बिझनेस श्रेणीचे आहेत. एअर इंडियाच्या ताफ्यात ६६ ए ३२० विमान पूर्वीपासूनच आहेत. कुवैतच्या एव्हिएशन लिज अ‍ॅण्ड फायनान्स कंपनीकडून हे विमान भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहे. औपचारिकरीत्या हे विमान ताफ्यात दाखल झाल्यानंतर एअर इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य संचालक अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, या वर्षी ताफ्यात ए ३२० निओची एकूण १४ विमाने सहभागी करून घेण्यात येणार आहेत. ते म्हणाले की, विमानांचा उपयोग आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी करण्याबाबत विचार करण्यात येईल. एअर इंडियाच्या ताफ्यातील विमानांची संख्या आता १३८ झाली आहे. एअर इंडियाने आपल्या ताफ्यात २०१९पर्यंत २९ ए ३२० निओ विमाने सहभागी करून घेण्याची योजना आखली आहे. तर, एअर इंडियाने यापूर्वीच २२ विमानांसाठी एएलएएफसीओ, जीई कॅप्स व सीआयटीसोबत करार केला आहे. उर्वरित सात विमानांसाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.