Join us

एअर इंडियाच्या हवाई शाखेची विक्री सुरू, कंपनीचे चार भाग करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:11 AM

निर्गुंतवणूक प्रक्रियेत एअर इंडियाचे (एआय) चार भाग करण्यात येणार असून, चारही भागांची स्वतंत्रपणे विक्री करण्यात येणार आहे. यातील एअरलाइन आर्म म्हणजे हवाई वाहतूक शाखा सर्वप्रथम विक्रीस काढण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - निर्गुंतवणूक प्रक्रियेत एअर इंडियाचे (एआय) चार भाग करण्यात येणार असून, चारही भागांची स्वतंत्रपणे विक्री करण्यात येणार आहे. यातील एअरलाइन आर्म म्हणजे हवाई वाहतूक शाखा सर्वप्रथम विक्रीस काढण्यात येणार आहे.एअर इंडियावर ७0 हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, ते कंपनीच्या चारही विभागांवर विस्तारलेले आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, एअर इंडियाचे एआय-एआय एक्स्प्रेस-एआय सॅटस, ग्राउंड हँडलिंग युनिट, इंजिनीअरिंग युनिट आणि अलायन्स एअर, असे चार भाग करण्यात येतील. यातील एअरलाइन आर्मच्या विक्रीसाठी दोन आठवड्यांत निविदा जारी होतील. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने इतर विभागांना विक्रीसाठी खुले केले जाईल.सूत्रांनी सांगितले की, एअर इंडियाचा एअरलाइन आर्म हाच प्रामुख्याने दृश्य विभाग आहे. इतर विभाग लोकांना माहितीही नसतात. हा दृश्य विभाग अधिक गुंतागुंतीचाही असल्याने, विक्रीसाठी जरा कठीण आहे. त्यामुळे त्याची पहिल्यांदा विक्री करण्यात येईल.कोणत्या कंपन्या आहेत इच्छुक?एअर इंडियाच्या एअरलाइन आर्मसाठी इंडिगोने औपचारिक प्रस्ताव दिला आहे. एअर इंडियाचा आंतराष्टÑीय व्यवसाय आणि एआय एक्स्प्रेस यांच्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. टाटा सन्स-सिंगापूर एअर लाइन्सच्या जेव्ही विस्तारा कंपनीनेही खरेदीत रस दर्शविला आहे. याशिवाय एका विदेशी कंपनीनेही खरेदीचा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, आमच्याशी संपर्क साधणारी विदेशी कंपनी ज्ञात हवाई कंपनी नाही. एखाद्या प्रसिद्ध हवाई वाहतूक कंपनीच्या पाठीशी ती आहे का, याचीही माहिती नाही. एअर इंडियाच्या एअरलाइन आर्ममधील ४९ टक्के हिस्सेदारी ही कंपनी खरेदी करू इच्छिते. भारतीय नियमानुसार विदेशी कंपनीला एवढीच हिस्सेदारी खरेदी करण्याचा अधिकार आहे.कतारचा प्रस्ताव नाहीजेटसारख्या काही कंपन्या तूर्त दुरून लक्ष ठेवून आहेत. कंपनीची नेमकी किती किंमत लागते, व्यवहार कसा होईल, याची माहिती घेण्यासाठी त्यांना दस्तावेजांची प्रतीक्षा आहे. कतार एअरवेजचे सीईओ अकबर अल बाकेर यांनी भारतात विमान कंपनी सुरू करण्याचे मनसुबे अलीकडेच जाहीर केले आहेत. तथापि, कंपनीकडून याबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव अद्याप आलेला नाही.

टॅग्स :एअर इंडियाभारतव्यवसाय