Join us

एअर इंडियाची बंगळुरू ते सॅन फ्रान्सिस्को सेवा

By admin | Published: November 24, 2015 11:47 PM

एतिहाद एअरवेजला आता अमेरिकेत जाणाऱ्या प्रवाशांना एअर इंडियाशी स्पर्धा करावी लागणार आहे. एअर इंडियाची येत्या दोन डिसेंबरपासून बंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्को अशी सेवा सुरू होत आहे

बंगळुरू : एतिहाद एअरवेजला आता अमेरिकेत जाणाऱ्या प्रवाशांना एअर इंडियाशी स्पर्धा करावी लागणार आहे. एअर इंडियाची येत्या दोन डिसेंबरपासून बंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्को अशी सेवा सुरू होत आहे. त्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांनी बंगळुरू विमानतळावर प्रवास आणि कस्टम तपासणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. २ डिसेंबरपासून एअर इंडियाची बंगळुरूहून नवी दिल्लीमार्गे सॅन फ्रान्सिस्कोला विमानसेवा सुरू होईल.बंगळुरूहून विमान नवी दिल्लीला जाईल व तेथून ते सॅन फ्रान्सिस्कोला. या तात्पुरत्या दिल्ली मुक्कामामुळे दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोपर्यंतचा प्रवास प्रचंड वेळ खाणारा असल्यामुळे एअर इंडियाच्या या नव्या सेवेला प्रवाशांचा कसा प्रतिसाद लाभतो हा प्रश्नच आहे. बंगळुरू आणि सॅन फ्रान्सिस्को ही दोन्ही ठिकाणे माहिती व तंत्रज्ञानाने जोडली गेलेली असून तेथे समाईक कार्यालयेही आहेत, त्यामुळे या शहरांदरम्यान वाहतूक प्रचंड आहे. एका अंदाजानुसार बंगळुरूमध्ये माहिती व तंत्रज्ञान आणि बीपीओ क्षेत्रांमध्ये १.५ दशलक्ष लोक कामास आहेत.संयुक्त अरब अमिरातीची एतिहाद एअरवेज ही राष्ट्रीय हवाई सेवा असून ती बंगळुरूशी अबुधाबीमार्गे सॅन फ्रान्सिस्कोला जोडली गेलेली आहे. एतिहाद एअरवेजने सगळ्यात आधी अमेरिकन अधिकाऱ्यांकडून अबुधाबी विमानतळावर प्रवास आणि कस्टम सेवा देण्यास प्रारंभ केला. अबुधाबी ते सॅन फ्रान्सिस्को हा एतिहादच्या विमानातून केलेला प्रवास हा देशांतर्गत प्रवासासारखाच वाटतो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विमान सॅन फ्रान्सिस्कोला उतरल्यानंतर तेथे कोणत्याही औपचारिकता करण्याची गरजच ठेवण्यात आलेली नाही.एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया-१७३ उड्डाण ए ३२१ विमानातून बंगळुरू ते दिल्ली दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी होईल. हे विमान दिल्लीत ११.४५ वाजता उतरेल. नंतर तेथून ते उड्डाण एआय-१७३ सॅन फॅ्रन्सिस्कोला बी ७७७-२०० एलआर पहाटे ०२३५ वाजता दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी होईल.हे विमान सॅन फ्र ान्सिस्कोत त्याच दिवशी स्थानिक वेळेनुसार सकाळी सात वाजता पोहोचेल. या विमानाचा परतीचा प्रवास सकाळी १०.३० वाजता सुरू होऊन ते दिल्लीत दुसऱ्या दिवशी (गुरुवार, शनिवार आणि सोमवार) पोहोचेल आणि दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी एअरबस ए-३२१ बंगळुरूला रवाना होऊन ५ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.बंगळुरू ते वॉशिंग्टन डीसी (मार्गे फ्रँकफर्ट), बंगळुरू ते आयएडी (फ्रँकफर्ट मार्गे) :लुफ्तान्साच्या विमानाने बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ ते वॉशिंग्टन ड्युलस आंतरराष्ट्रीय विमानतळ (मार्गे फ्रँकफर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ, जर्मनी. २६ तास ५५ मिनिटे