Join us

एअर इंडियाचा नफा २० टक्क्यांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 2:35 AM

एअर इंडियाच्या मार्च-एप्रिल २०१८ या वर्षात २० टक्के महसुलात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विमानाच्या उड्डाण तासांत वाढ करणे

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या मार्च-एप्रिल २०१८ या वर्षात २० टक्के महसुलात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विमानाच्या उड्डाण तासांत वाढ करणे, जास्तीची विमानांच्या फेऱ्या वाढविण्यावर लक्ष केंद्रित करून फेºयांचे विश्लेषण एअर इंडिया करीत असल्याचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंह खरोला यांनी सांगितले. एअर इंडियाच्या प्रवाशांची वाढलेली संख्या, वेळापत्रकाचे होत असलेले पालन आणि महसुलात झालेली वाढ यामुळे उल्हसित होऊन देशातील, तसेच विदेशातील सेवेत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत, असे खरोला म्हणाले. मार्च ते एप्रिल दरम्यान महसुलात २० टक्के वाढ झाली आहे. २०१६-२०१७ वर्षात महसुलात साधारणत: तीन हजार कोटी रुपये वाढ झाली होती.