Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमान तिकिटांच्या ‘मनमानी’वरून संताप

विमान तिकिटांच्या ‘मनमानी’वरून संताप

सुट्ट्यांचा काळ जवळ येताच विमानसेवा कंपन्या भरमसाठ तिकीट दर आकारत असल्याबद्दल संसदीय समितीने संताप व्यक्त केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 05:24 AM2018-12-22T05:24:45+5:302018-12-22T05:25:00+5:30

सुट्ट्यांचा काळ जवळ येताच विमानसेवा कंपन्या भरमसाठ तिकीट दर आकारत असल्याबद्दल संसदीय समितीने संताप व्यक्त केला आहे.

 Air rage 'arbitrariness' | विमान तिकिटांच्या ‘मनमानी’वरून संताप

विमान तिकिटांच्या ‘मनमानी’वरून संताप

नवी दिल्ली : सुट्ट्यांचा काळ जवळ येताच विमानसेवा कंपन्या भरमसाठ तिकीट दर आकारत असल्याबद्दल संसदीय समितीने संताप व्यक्त केला आहे. हे तिकीट दर ‘मनमानी’ आहेत. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी समितीने केली आहे.
विमानांचे तिकीटदर सातत्याने बदलते असतात. सुट्ट्या व सणांचा काळ सुरू होताच दर वधारतात. यावर संसदेच्या परिवहन, पर्यटन व सांस्कृतिक समितीने तीव्र आक्षेप घेतला आहे. अनेकदा हे दर आगाऊ बुकिंगपेक्षा दहापट अधिक असतात. ही कंपन्यांची निव्वळ मनमानी आहे, असे मत समितीने नोंदवले आहे.
समितीच्या या अहवालावरील कृती अहवाल सरकारने राज्यसभेत मांडला. त्यात सरकारने कंपन्यांचीच बाजू मांडली. बाजारातील स्थिती व मागणीनुसार जागतिक निकषांवर आधारित हे दर असतात, असे सरकारने कृती अहवालात मांडले आहे. सरकारच्या कृती अहवालावर समितीने नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी

केरळमधील पुरावेळी विमानसेवा कंपन्या याच पद्धतीने भरमसाठ तिकीट आकारत होते. त्यावेळी नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी टष्ट्वीटरवरुन त्यांना समज दिली होती. तसेच प्रभू यांनी करावे, अशी मागणी समितीने केली.

Web Title:  Air rage 'arbitrariness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.